RBI Governor Shaktikanta Das: RBI गव्हर्नरांनी 2000 च्या नोटेबाबत दिली मोठी अपडेट, सरकारने का घेतला हा निर्णय?

RBI Governor Shaktikanta Das: रिझर्व्ह बँकेने आज सर्वसामन्यांना मोठा दिलासा दिला. बॅंकेने रेपो दरात कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही.
RBI Governor Shaktikanta Das
RBI Governor Shaktikanta DasDainik Gomant

RBI Governor Shaktikanta Das: रिझर्व्ह बँकेने आज सर्वसामन्यांना मोठा दिलासा दिला. बॅंकेने रेपो दरात कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. आरबीआयच्या मॉनटेरी पॉलिसीचा आज शेवटचा दिवस होता, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

आज गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 2000 रुपयांच्या नोटेबाबतही एक महत्त्वाचे अपडेट दिली. दास म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने फायदा झाला आहे.

यासोबतच लिक्विडिटीमध्येही वाढ झाली आहे. आतापर्यंत 2000 रुपयांच्या 87 टक्के नोटा परत आल्या आहेत.

2000 रुपयांच्या नोटांबाबत

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटांबाबत सरकारने (Government) घेतलेल्या निर्णयामुळे अतिरिक्त लिक्विडिटी वाढली आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्यानंतर लिक्विडिटीमध्ये वाढ दिसून आली.

दरम्यान, लिक्विडिटी ही रक्कम प्रतिबिंबित करते, जी कर्जाची पूर्तता करण्यासाठी तात्काळ उपलब्ध आहे किंवा गुंतवणुकीसाठी वापरली जाते. यासह, ती रोख पातळी देखील दर्शवते.

RBI Governor Shaktikanta Das
7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार निराशा, एवढ्या टक्क्यांनी DA वाढणार!

19 मे रोजी हा निर्णय घेण्यात आला

गेल्या आठवड्यात मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलैपर्यंत चलनातून बाद झालेल्या 2000 रुपयांच्या नोटांची एकूण किंमत 3.14 लाख कोटी रुपये आहे. केंद्र सरकारने 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता.

RBI Governor Shaktikanta Das
7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA बाबत मोठी अपडेट, 1 जानेवारी 2024 पासून...

जून आणि एप्रिल तिमाहीतही कोणताही बदल झालेला नाही

मागील जून आणि एप्रिलच्या पतधोरण आढावा बैठकीतही RBI ने रेपो दरात बदल केला नाही. यापूर्वी, प्रामुख्याने महागाई (Inflation) नियंत्रणात आणण्यासाठी, रेपो दरात गेल्या वर्षी मे महिन्यापासून सहा वेळा 2.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com