Digital Rupee: देशात डिजिटल रुपया लॉन्च होणार? आरबीआयकडून आली महत्त्वाची अपडेट

Digital Rupee: मोदी सरकार विविध विकास योजना राबवत आहेत. दरम्यान, देशात डिजिटल रुपयाबाबतही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
RBI
RBI Dainik Gomantak
Published on
Updated on

Digital Rupee: मोदी सरकार विविध विकास योजना राबवत आहे. दरम्यान, देशात डिजिटल रुपयाबाबतही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

यातच आता, डिजिटल रुपयाबाबत आरबीआयकडून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे देशात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

वास्तविक, डिजिटल रुपया आरबीआय लवकरच पायलट प्रोजेक्ट म्हणून लॉन्च करु शकते. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया...

RBI

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ऑक्टोबरपर्यंत कॉल मनी मार्केटमधील व्यवहारांसाठी प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया सादर करु शकते. सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक अजय कुमार चौधरी यांनी रविवारी ही माहिती दिली.

होलसेल सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC), डिजिटल रुपी-होलसेल (E-W) म्हणून ओळखले जाणारे, 1 नोव्हेंबर 2022 रोजी लॉन्च करण्यात आले. त्याचा वापर सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजारातील व्यवहारांच्या निपटारापुरता मर्यादित होता.

RBI
जगात भारी! RBI गव्हर्नर शक्तीकांत दास ठरले सर्वोत्तम बॅंकर

G20

"रिझर्व्ह बँक या महिन्यात किंवा पुढील महिन्यात कॉल मार्केटमध्ये घाऊक CBDC ऑफर करेल," असे G-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत चौधरी म्हणाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात (Budget) CBDC लॉन्च करण्याची घोषणा केली होती. वित्त विधेयक, 2022 मंजूर झाल्यामुळे, RBI कायदा, 1934 च्या संबंधित कलमात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.

RBI
UPI Lite Limit: UPI वापरकर्त्यांसाठी RBI ची मोठी घोषणा, पेमेंट करण्यासाठी...!

या बँका आहेत

RBI ने घाऊक CBDC च्या पायलट प्रोजेक्टसाठी नऊ बँकांची निवड केली आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. तसेच देशातील प्रसिद्ध आणि मोठ्या बँकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com