Paytm Payments Bank: बिनधास्त राहा! पेटीएमवरील कारावाईचा ग्राहकांना कोणताही धोका नाही, आरबीआयची हमी

RBI On Paytm Payments Bank Customers: दास यांनी जोर दिला की आरबीआय आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला अनुकूल आहे. ते म्हणाले, 'आरबीआय फिनटेकला पूर्ण समर्थन करते आणि पुढेही करत राहील.
Paytm Payments Bank: RBI Assures That Action On Paytm Poses No Risk To Customers
Paytm Payments Bank: RBI Assures That Action On Paytm Poses No Risk To CustomersDainik Gomantak
Published on
Updated on

RBI Governer On Paytm Payments Bank:

गेल्या काही दिवसांपासून पेटीएमवर कोणती ना कोणती कारवाई होत आहे. अशात पेटीएम ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

मात्र, याबाबत खुलासा करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईमुळे 80 ते 85 टक्के पेटीएम वॉलेट ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. तसेच उर्वरित ग्राहकांना त्यांचे ॲप इतर बँकांशी लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Paytm Payments Bank: RBI Assures That Action On Paytm Poses No Risk To Customers
Salary Hike: यंंदाच्या वर्षी भारतीयांचे पगार 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार, 80 कंपन्यांच्या माहितीतून मोठा खुलासा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 31 जानेवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) ला कोणत्याही ग्राहकाच्या खात्यातील ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप स्वीकारण्यास मनाई केली होती.

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की PPBL शी जोडलेल्या वॉलेटवर इतर खात्यांमधून बंदी घालण्यात येईल. बँकांशी लिंक करण्याची अंतिम मुदत 15 मार्च निश्चित करण्यात आली आहे. १५ मार्चपर्यंत दिलेली मुदत पुरेशी असून ती वाढवण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

Paytm Payments Bank: RBI Assures That Action On Paytm Poses No Risk To Customers
Gambling: जुगार-सट्टेबाजीची जाहिरात केल्यास सेलिब्रिटी आणि ॲप्स येणार गोत्यात, CCPA कडून बेकायदेशीर कामांवर बंदी

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, एकूण पेटीएम वॉलेटपैकी 80 ते 85 टक्के इतर बँकांशी जोडलेले आहेत आणि उर्वरित 15 टक्के वॉलेट्सना इतर बँकांमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ते म्हणाले की आरबीआयने नियमन केलेल्या घटकाविरुद्ध कारवाई केली आहे, जी या प्रकरणात पीपीबीएल आहे आणि त्यात फिनटेक कंपन्यांविरुद्ध काहीही नाही.

एका मुलाखतीदरम्यान, दास यांनी जोर दिला की आरबीआय आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला अनुकूल आहे. ते म्हणाले, 'आरबीआय फिनटेकला पूर्ण समर्थन करते आणि पुढेही करत राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com