रेपो दरात वाढ, गृहकर्जासह सर्व कर्ज महागणार : आरबीआय गव्हर्नर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्टपणे सांगितले आहे की व्याजदर वाढवण्याची ही योग्य वेळ आहे.
RBI
RBI Dainik Gomantak
Published on
Updated on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) स्पष्टपणे सांगितले आहे की व्याजदर वाढवण्याची ही योग्य वेळ आहे. महागाई हा सध्या सर्वात मोठा चिंतेचा विषय असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी यावेळी म्हटलं आहे. (RBI repo rate hike all loans including home loans will become more expensive RBI Governor)

RBI
राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले?

जूनच्या पहिल्या आठवड्यात आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीचे ठळक मुद्दे जाहीर करताना, रिझर्व्ह बँकेने सांगितले की महागाई सध्या आमच्या व्याप्तीच्या बाहेर जात आहे. व्याजदर वाढवण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. आरबीआयने जाहीर केलेल्या एमपीसीमध्ये व्याजदर वाढवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगण्यात आले. महागाई नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देण्याचे दुहेरी आव्हान देखील आहे.

एका महिन्यात महागाईवर 0.90 टक्क्यांनी मात करण्यासाठी रिझर्व्ह बँक सध्या कर्ज महाग करत आहे. यामुळेच 8 जून रोजी एमपीसीच्या बैठकीत रेपो दरात 0.50 टक्के वाढ करण्यात आली होती. याच्या सुमारे महिनाभरापूर्वी गव्हर्नर दास यांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन रेपो दरात 0.40 टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती दिली होती. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात कर्जाचे व्याजदर 0.95 टक्क्यांनी वाढले आहे.

महागाईचा अंदाजही 2.20 टक्क्यांनी वाढला आहे,

महागाईबाबत रिझर्व्ह बँकेवर किती दबाव आहे, हे नुकत्याच झालेल्या एमपीसीच्या बैठकीच्या निर्णयांवरून आपल्याला कळू शकते. आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज 2.20 टक्क्यांनी वाढवून 6.7 टक्क्यांवर नेला आहे. सर्व प्रयत्न करूनही चलनवाढ 6 टक्क्यांच्या निश्चित मर्यादेपेक्षा खाली येणार नाही, असा विश्वास आहे. किरकोळ चलनवाढीचा दर मे महिन्यात 7.04 टक्के होता, जो एप्रिलमध्ये 7.79 टक्के एवढा झाला होता. तसेच आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज 7.2 टक्के कायम ठेवला आहे.

RBI
Business Idea: फक्त 50,000 रुपये गुंतवून सुरू करा मोत्यांची शेती

सर्व काही महागाईवर अवलंबून आहे,

एमपीसी सदस्य मायकेल पात्रा म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे निर्णय मोठ्या प्रमाणात महागाईवर अवलंबून असणार आहेत. आमचा अंदाज पुढील तीन किंवा चार तिमाहींसाठीचा आहे आणि त्यादरम्यान किरकोळ महागाईचा दरही खाली येऊ शकतो. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात महागाईपासून दिलासा मिळाला तर व्याजदर वाढणे देखील थांबू शकतो. एमपीसी सदस्यांनी देखील सूचित केले की ऑगस्टच्या बैठकीत रेपो दरात पुन्हा एकदा वाढ होऊ शकते.

ऑगस्टमध्ये एमपीसीच्या बैठकीत पुन्हा रेपो रेट वाढल्यास सर्वसामान्यांवर कर्जाचा बोजाही वाढणार आहे असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यमान आणि नवीन कर्जदारांना गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारच्या किरकोळ कर्जांवर जास्त EMI भरावे लागणार आहे. महागाई नियंत्रणात येईपर्यंत व्याजदर वाढवण्याचा ट्रेंड कायम राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com