Ration Card News: रेशन घेणाऱ्यांसाठी (रेशन कार्डधारक) एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रेशनचा फायदा घेत असाल तर आता मे महिन्यात तुम्हाला दुप्पट रेशन मिळणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशनकार्डधारकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आता मे महिन्यात कार्डधारकांना दोन वेळा रेशन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यामुळे गरीब कुटुंबांना खूप मदत होईल. याचा फायदा कोणत्या लोकांना मिळणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हरियाणा सरकारने सांगितले की, आतापर्यंत गरीब कुटुंबांना एप्रिल महिन्याचे रेशन दिलेले नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय सरकारने (Government) घेतला आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार एप्रिल महिन्यात रेशनचा लाभ न मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांना दुप्पट रेशन मिळणार आहे.
त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा रेशनचा साठाही रेशन डेपोत पोहोचला आहे. फक्त बीपीएल आणि एएवाय कार्डधारकांनाच याचा लाभ मिळेल.
हरियाणातील रेशनकार्डधारकांना एप्रिल महिन्याचे रेशन 8 मे पर्यंत मिळेल. अन्न आणि पुरवठा विभागाने आदेश जारी केल्यानंतर रेशन दुकानदार आणि ग्राहकांना (Customers) मोठा दिलासा मिळाला आहे.
रेशन वितरणाची मुदत वाढवून देण्याची मागणी दुकानदारांनी केली होती. रेशन वाटपाच्या दिरंगाईबाबत रेशन दुकानदारांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यानंतर आता विभागाने रेशन वितरणाची मुदत वाढवली आहे.
रेशन न मिळाल्याने ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विभागाकडून रेशन मिळत नसल्याने कार्डधारकांना वाटप करता येत नाही. गेल्या आठवड्यात अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन रेशन वाटपाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.