घरातून बाहेर काढलेल्या मुलीने शार्क टँक इंडियात केली कमाल

हे स्टार्टअप लहान शहरातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समुदाय तयार करण्यात मदत करते.
Saurab Mangrulkar, Vinktesh Prasad, Rakhi Pal
Saurab Mangrulkar, Vinktesh Prasad, Rakhi PalTwitter/@sharktankindia
Published on
Updated on

स्टार्टअप्सवर (Startup) केंद्रित रिअ‍ॅलिटी शो शार्क टँक इंडियाचा (Shark Tank India) पहिला सीझन संपला आहे. या हंगामात सुमारे 200 कल्पना सादर केल्या गेल्या. या शोमधील जजना प्रभावित करणारे एक नाव होते, ज्याने जजसोबत प्रत्येकाला भावूक केले होते. आणि ते नाव एका महिलेचे होते. आपल्या दोन भागीदारांसह स्टार्टअप चालवणारी ती राखी होती.

राखीच्या स्टार्टअपचे बिझनेस मॉडेल असे आहे

राखी पाल (Rakhi Pal) तिच्या दोन पार्टनर सौरभ मंगरूळकर आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यासोबत, edtech एडटेक स्टार्टअप इवेंटबीप चालवतात. हे स्टार्टअप लहान शहरातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समुदाय तयार करण्यात मदत करते. शार्क टँक इंडियाच्या एका एपिसोडमध्ये या तिघांनी सांगितले की, आयआयटी किंवा आयआयएम सारख्या संस्थांमधील खास गोष्ट म्हणजे तेथील विद्यार्थ्यांना चांगला समुदाय मिळतो. असे अनेक लोक आहेत ज्यांनी परदेशात शिक्षण घेतले आहे आणि अनेक लोक यशस्वी कंपनी चालवत आहेत. छोट्या शहरातील महाविद्यालये येथे मागे राहिली आहेत. ही दरी भरून काढणे हे या स्टार्टअपचे ध्येय आहे.

अशी सुरू झाली ही कहाणी

शोमध्ये सौरभने सांगितलं की, त्याने वयाच्या 15व्या वर्षी व्यवसाय करण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षणाचा सर्व खर्च त्यांनी स्वतः व्यवसायातून उचलला होता. सगळ्यात वेगळी कहानी होती ती राखी पालची. जिने सर्व जजला भावूक केले होते. सौरभने सांगितले की उत्तर प्रदेशात कुटुंबातील मुलींना व्यवसाय करण्याची परवानगी नाही. तरीही त्यांनी हा व्यवसाय सुरू केला, त्यामुळे त्यांना घराबाहेर हाकलण्यात आले.

Saurab Mangrulkar, Vinktesh Prasad, Rakhi Pal
SBI ग्राहकांसाठी 'खुशखबर', FD वर बँकेने वाढवले ​​व्याज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

मुलीचे व्यवसाय करणे घरच्यांनी नाकारले

खरे तर राखीच्या कुटुंबीयांची इच्छा होती की तिने स्वयंपाक करणे, भांडी साफ करणे यासारखी घरातील कामे करावीत. दुसरीकडे राखीचा हट्ट होता की, स्वत:ची कंपनी स्थापन करून व्यावसायिक जगतात नाव कमवायचे. सुमारे 2 वर्षे ती कॉलेजला जाण्याच्या नावाखाली तिच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जात होती. व्यवसाय सुरळीत चालला आहे असे वाटल्यावर त्यांनी घरच्यांना याबाबतची हकीकत सांगितली. यामुळे कुटुंबीय संतप्त झाले आणि त्यांनी राखीला हाकलून दिले. आजही ती घरापासून दूर एकटी राहून व्यवसाय चालवत आहे.

स्टार्टअपला शोमधून मिळाला निधी

शोच्या जजना या तिघांची कल्पना आवडली. 2 टक्के भागिदारीच्या बदल्यात तिघे पार्टनर 20 लाख रुपयांची डिमांड करत होते. या मागणीवर त्यांना शोच्या 3 जजनी ऑफर्स दिली. नंतर, तिन्ही भागीदारांनी परस्पर सल्लामसलत केल्यानंतर तिन्ही न्यायाधीशांना एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आणि 3 टक्के शेअरसाठी 40 लाख रुपयांची मागणी केली. अखेर 30 लाख रूपयांवर ही डील फायनल झाली.

Saurab Mangrulkar, Vinktesh Prasad, Rakhi Pal
तुम्हाला एलपीजीवर सबसिडी मिळते की नाही? असे चेक करा

अश्नीरच्या ऑफरचे कौतुक

शोमध्ये अँग्रीमॅनची ख्याती मिळवलेल्या भारतपेच्या अश्नीर ग्रोव्हरने राखीला 10 लाख रुपये वेगळे देण्याची ऑफर दिली. राखीकडून फक्त 0.5 टक्के हिस्सा घेत असून त्यासाठी 10 लाख रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रोव्हर म्हणाले की शेवटी पैसे येतात की नाही हे कुटुंबासाठी महत्त्वाचे असते. राखीची आवड पाहून ते प्रभावित झाले आहे आणि या कारणास्तव राखीला कमी इक्विटीवर 10 लाख रुपये स्वतंत्रपणे देऊ केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com