तुम्हाला एलपीजीवर सबसिडी मिळते की नाही? असे चेक करा

एलपीजी सबसिडीद्वारे तुम्हाला मोठा दिलासा देखील मिळू शकतो. सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात पाठवले जातात हे जाणुन घ्या.
LPG Subsidy
LPG SubsidyDainik Gomantak
Published on
Updated on

एलपीजी गॅस (LPG Subsidy) सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तसेच एलपीजी सबसिडीद्वारे तुम्हाला मोठा दिलासा देखील मिळू शकतो. सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात पाठवले जातात हे जाणुन घ्या. (How to Check LPG Subsidy)

LPG Subsidy
SBI ग्राहकांसाठी 'खुशखबर', FD वर बँकेने वाढवले ​​व्याज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

तुम्ही एलपीजी सबसिडी मिळवण्यास पात्र असाल तर तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही ते आधी तपासा. मिळत असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे येतात की नाही? जर पैसे येत नसतील तर तुम्ही ताबडतोब तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करून घ्या. लिंक खात्याशी जोडल्यानंतर, पैसे थेट तुमच्या खात्यात येऊ लागतील.

सबसिडी न मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे खाते क्रमांकाशी एलपीजी आयडी लिंक न करणे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या वितरकाशी संपर्क साधावा. त्याच वेळी, तुम्ही 188002333555 या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. एलपीजीची सबसिडी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असते, ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना गॅस सबसिडी दिली जात नाही. 10 लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांची मिळकत आहे.

सर्वप्रथम तुम्हाला www.mylpg.in या वेबसाइटवर जावा

येथे तुम्हांला उजवीकडे तीन कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.

तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरसोबत असलेल्या गॅस सिलेंडरच्या फोटोवरती क्लिक करा.

यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, त्यामध्ये तुमच्या गॅस सर्व्हिस प्रोव्हायडरची माहिती असेल.

उजव्या बाजूला वरच्या बाजूला Sign in आणि New User चा पर्याय असेल, सिलेक्ट करा.

साइन इन करा, अन्यथा तुम्हाला नवीन वापरकर्ता निवडावा लागेल.

यानंतर आणखी एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये उजव्या बाजूला View Cylinder Booking History हा पर्याय असेल, तो निवडा.

तुम्हाला सबसिडी मिळतेय की नाही ते कळेल. तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर तुम्ही 188002333555 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com