Assembly Elections: निवडणुकीपूर्वी महिलांना मोठी भेट, 'ही' मूल्यवान गोष्ट खरेदीसाठी सरकार देणार पैसे!

Rajasthan Government: राजस्थानमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधी राज्यातील गेहलोत सरकार जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
Smartphone
SmartphoneDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Rajasthan Government: राजस्थानमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधी राज्यातील गेहलोत सरकार जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच क्रमाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महिलांसाठी खास योजना आणली आहे.

ही योजना मोबाईलबाबत आहे, ज्या अंतर्गत महिलांना त्यांच्या आवडीचा मोबाईल खरेदी करता येणार आहे. सीएम गेहलोत म्हणाले की, सरकार ऑगस्टमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना सुरु करेल. स्मार्टफोनच्या बदल्यात आम्ही महिलांना विशिष्ट रोख रक्कम देऊ.

काय म्हणाले सीएम गेहलोत?

मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) म्हणाले की, 'सरकार एका प्रकारचे मोबाइल देऊ शकते, पण बाजारात अनेक प्रकारचे मोबाइल आहेत, त्यामुळे आम्ही लोकांना पर्याय देऊ की तुम्ही जा आणि तुमच्या आवडीचा फोन घ्या, सरकार पैसे देईल. पण त्यासाठी एक निश्चित रक्कम ठरवण्यात आली आहे.'

काही दिवसांपूर्वी अशोक गेहलोत म्हणाले होते की, 'आम्ही तुम्हाला एक स्मार्टफोन (Smartphone) मोफत देऊ, ज्यामध्ये तुम्हाला 3 वर्षांसाठी मोफत इंटरनेट मिळेल.' गेहलोत यांनी 2021 च्या बजेटमध्ये राजस्थानमधील 1.35 कोटी महिलांना स्मार्टफोन देण्याची घोषणा केली होती. काही काळापूर्वी त्यांनी यावर्षी 30 ऑगस्टपासून रक्षाबंधनापासून टप्प्याटप्प्याने स्मार्टफोन देण्याचेही सांगितले आहे.

Smartphone
RBI Imposes Penalty: HDFC आणि HSBC नंतर RBI ने 'या' बँकाना ठोठावला दंड, तुमचे खाते त्यात आहे का?

दुसरीकडे, या योजनेबाबत मुख्यमंत्री गेहलोत पुढे म्हणाले की, मोबाईल ही अशी वस्तू आहे, जर तुम्ही बाजारात खरेदी करायला गेलात तर तुम्हाला तुमच्या आवडीचा मिळेल. लाइक… किती GB चा मोबाईल घ्यायचा… तुम्हाला कोणता ब्रँड आवडतो जो तुम्हाला घ्यायचा आहे. कोणते मॉडेल खरेदी करायचे?

Smartphone
RBI Governer : 2000 नंतर 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार का? वाचा, RBI गव्हर्नर काय म्हणतायेत

याबाबत आम्ही कंपन्यांशी बोलत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कंपन्यांनी महागाई रिलीफ कॅम्पसारखे काउंटर उभारुन लोकांना पर्याय द्यावा. महिला सक्षमीकरण हा स्मार्टफोन देण्यामागचा उद्देश असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pradhan Mantri Matru Vandana Yojana
goa st community political reservation demand
BJP plans to increase women representation in Goa Assembly
Scheduled Tribes Of Goa Demand
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com