देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याच्या घटनेला रविवारी 30 जानेवारीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या, या साथीचा तसेच कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांचा देशाने मुकाबला केला आहे. इतके सारे होऊनही केवळ भारतातच (India) नव्हे तर जगभरात कोरोनाची साथ (Corona) संपण्याची चिन्हे अद्याप दिसून आली नाहीत. चीनमधील वुहान विद्यापीठात वैद्यकीय शाखेत शिकणारी भारतीय युवती केरळमध्ये आली आणि ती देशातील पहिली कोरोना रुग्ण ठरली होते. त्यानंतरच्या काळात भारतात कोरोनाचा (Corona Virus) मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला, लस तसेच ऑक्सिजनचा देखील तुटवडा खूप जाणवला होता.
डेल्टानंतर ओमायक्रॉनच्या (Omicron) विषाणूमुळे तिसरी लाट आली. ओमायक्रॉन पूर्वीच्या विषाणूंपेक्षा तुलनेने कमी घातक असल्याचा काही जणांकडून दावा करण्यात येतो परंतु या नव्या विषाणूमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. 2 जानेवारीपासून कोरोनाच्या दीड लाख नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले होते. त्यातील 71,428 जणांमध्ये कोरोना विषाणूचे अस्तित्व आढळले आणि त्यापैकी 67,700 नागरिक देशातील, तर 3,728 जण विदेशातील होते. 71,428 जणांपैकी 41,420 जणांना डेल्टा विषाणूचा संसर्ग झाला होता व उर्वरित रुग्ण कोरोनाच्या अन्य प्रकारच्या विषाणूंनी बाधित झाले होते.
देशात कोरोनारुग्णांच्या वाढत्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होते असल्याचे समोर आहे आहे. मात्र, देशात कोरोनारुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं देखील समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 09 हजार 918 जणांना कोरोनाची लागण झाली असून 959 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे आणि आता त्यांची संख्या 18,84,937 वरती आली आहे, जी एकूण संक्रमित संख्येच्या 4.59 टक्के एवढी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.