1961 मध्ये लव्ह मॅरेज; राहुल बजाज यांनी सांगितला होता किस्सा

राहुल बजाज मोठे झाले आणि त्यांना मुलगा झाल्यावर त्यांनी नेहरू-गांधी कुटुंबातील परंपरा कायम ठेवत आपल्या मुलाचे नाव राजीव ठेवले.
Rahul Bajaj had love marriage with Rupa Gholap in 1961
Rahul Bajaj had love marriage with Rupa Gholap in 1961Dainik Gomantak
Published on
Updated on

बजाज ग्रुपचे (Bajaj Group) माजी अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे काल निधन झाले. पण तुम्हाला माहित आहे का की ते स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू आहेत ज्यांना महात्मा गांधी आपले पुत्र मानत होते. जमनालाल बजाज यांनी 1926 मध्ये बजाज समूहाची स्थापना केली आणि नंतर त्यांचा मुलगा कमलनयन बजाज यांनी समूहाचा व्यवसाय पुढे नेला. जमनालाल बजाज हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी महात्मा गांधींच्या वर्धा आश्रमासाठी आपली जमीनही दान केली होती. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते.

10 जून 1938 रोजी कमलनयन बजाज आणि सावित्री बजाज यांना मुलगा झाला तेव्हा नेहरूंनी त्याचे नाव 'राहुल' असे ठेवले होते. जेव्हा इंदिरा गांधींना हे कळले तेव्हा त्या खूप संतापल्या, कारण त्यांना आपल्या मुलाचे नाव राहुल ठेवायचे होते. पण 20 ऑगस्ट 1944 रोजी जेव्हा त्यांना मुलगा झाला तेव्हा त्यांनी आपल्या मुलाच्या नावात बदल करून राजीव ठेवले होते.

Rahul Bajaj had love marriage with Rupa Gholap in 1961
इथेच रोवला 'हमारा बजाज' चा पाया

राहुलने मुलाचे नाव राजीव ठेवले कारण

राहुल बजाज मोठे झाले आणि त्यांना मुलगा झाल्यावर त्यांनी नेहरू-गांधी कुटुंबातील परंपरा कायम ठेवत आपल्या मुलाचे नाव राजीव ठेवले. पुढे राजीव गांधींना मुलगा झाल्यावर त्यांनी ही परंपरा पाळली आणि मुलाचे नाव राहुल गांधी ठेवले. राहुल बजाज यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नावही संजय गांधी यांच्याप्रमाणेच संजीव बजाज ठेवले आहे.

अशा प्रकारचे पहिले 'लव्ह मॅरेज'

एका टीव्ही मुलाखतीत राहुल बजाज यांनी आपल्या वयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. त्यांनी आपल्या आयुष्यात जो टप्पा गाठला त्याचे सर्व श्रेय त्याची पत्नी रूपा बजाज यांना जाते. लग्नाशी संबंधित एक अनोखी गोष्टही त्यांनी शेअर केली. 1961 मध्ये मराठी ब्राह्मण कुटुंबातील रुपा घोलप यांच्याशी त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या काळातील सर्व राजस्थानी मारवाडी उद्योग घराण्यात झालेला हा पहिला 'लव्ह मॅरेज' सोहळा होता, असे राहुल बजाज यांनी एका मुळाखतीत सांगितले.

Rahul Bajaj had love marriage with Rupa Gholap in 1961
'व्हॅलेंटाईन डे' ला होऊ शकते बँक अकाऊंट खाली, चुकूनही करू नका हे कामे

'हमारा बजाज' ने घरोघरी पोहोचला

बजाज ऑटो, जी प्रामुख्याने 3-व्हीलरच्या कामात गुंतलेली होती, ज्याचा पाया राहुल बजाज यांचे वडील कमलनयन बजाज यांनी घातला होता. आजही बजाज ऑटो ही जगातील सर्वात मोठी थ्री-व्हीलर एक्सपोर्ट कंपनी आहे. पण 1972 मध्ये बजाज ऑटोने 'चेतक' ब्रँड नावाची स्कूटर भारतीय बाजारात आणली. या स्कूटरने बजाजला देशाच्या कानाकोपऱ्यात ओळख मिळवून दिली. या स्कूटरमुळे भारतातील अनेक मध्यमवर्गीयांचे नवे स्वप्न किंवा पहिले स्वप्न पुर्ण केले. बजाज चेतकसाठी, कंपनीने विपणन धोरण म्हणून 'हमारा बजाज' हे घोषवाक्य तयार केले आहे. या घोषणेने अनेक पिढ्या लोकांच्या मनावर राज्य केले. आजही ही भारतातील सर्वात यशस्वी मार्केटिंग कंपनी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No UPI Day 2 October 2026 Merchant Protest
Punjab State Employees DA Increased to 50 Percent
Small Savings Schemes Interest Rates
SIM card misuse 3 years jail
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com