Adani Enterprises Share: अदानींवर प्रमोटर्सचा भरवसा हाय ना! 10 दिवसांत 25 कोटींहून अधिक शेअर्स केले खरेदी

Adani Enterprises Share Price: हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर 2023 च्या सुरुवातीला अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली होती.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak
Published on
Updated on

Adani Enterprises Share Price: हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर 2023 च्या सुरुवातीला अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली होती. मात्र यानंतर हळूहळू समूहाच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.

आता प्रमोटर समूहाने अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसमधील आपली भागीदारी वाढवून 69.87 टक्के केली आहे.

शेअर बाजाराला (Stock Market) दिलेल्या माहितीत अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने सांगितले की, प्रमोटर समूहाने कंपनीतील आपली भागीदारी 67.85 टक्क्यांवरुन 69.87 टक्के केली आहे.

पाच कंपन्यांमध्ये मोठा हिस्सा

दरम्यान, समूह कंपनी केम्पास ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने खुल्या बाजारातून 7 ते 18 ऑगस्ट या कालावधीत दोन टप्प्यांत अदानी एंटरप्रायझेसमधील एकूण 2.22 टक्के भागभांडवल (2.53 कोटी समभाग) खरेदी केले आहेत.

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म GQG Partners (GQG Partners) गेल्या काही महिन्यांत सातत्याने आपला स्टेक वाढवत असताना प्रमोटर समूहाने अदानी एंटरप्रायझेसमधील हिस्सा वाढवला आहे. समूहाच्या एकूण 10 कंपन्यांपैकी पाच कंपन्यांमध्ये GQG ची महत्त्वपूर्ण भागीदारी आहे.

Gautam Adani
Adani Enterprises: अदानींचे बल्ले-बल्ले, अदानी एंटरप्रायझेसने कमावला 820 कोटींचा बंपर नफा

मार्केट कॅप $ 150 अब्ज पर्यंत घसरले

दुसरीकडे, हिंडनबर्ग रिसर्चने वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये प्रतिकूल अहवाल आल्यानंतर अदानी एंटरप्रायझेससह बहुतांश समूह कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये $150 अब्जपर्यंत घट झाली होती.

मात्र, मार्चनंतर हळूहळू परिस्थिती सुधारु लागली आणि आता अदानी समूहाने (Adani Group) तोटा काही प्रमाणात भरुन काढला आहे. यामध्ये GQG भागीदारांच्या गुंतवणुकीची भूमिका आहे.

Gautam Adani
Gautam Adani Net Worth: अदानींची संपत्ती रातोरात वाढली, अब्जाधीशांच्या यादीत केलं शानदार कमबॅक; अंबानींपासून...

उपलब्ध आकडेवारीनुसार, अदानी समूहाच्या कंपन्यांमधील या गुंतवणूक फर्मची गुंतवणूक 38,700 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने नफ्यात 44 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण नफा वाढून 674 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच काळात ते 469 कोटी रुपये होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com