PM Kisan Scheme: दहावा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नसेल तर...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.
PM Kisan Scheme Government Scheme

PM Kisan Scheme Government Scheme

Dainik Gomantak

Published on
Updated on

PM Kisan New List for 10th Installment: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. 1 जानेवारी 2022 रोजी म्हणजेच आज PM मोदींनी PM-किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme Government Scheme) 10.09 कोटी शेतकऱ्यांना 20,900 कोटी रुपयांचा 10 वा हप्ता दिला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी ही रक्कम लाभार्थ्यांना दिली.

<div class="paragraphs"><p>PM Kisan Scheme Government Scheme</p></div>
2022 मध्येही क्रिप्टोकरन्सी यशस्वी ठरेल?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, केंद्र सरकार एका वर्षात 6,000 रुपये आर्थिक मदत पात्र शेतक-यांना उपलब्ध करून देते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते. जर तुमच्या खात्यात रक्कम पोहोचली नसेल, तर सर्वप्रथम तुमचे अकाउंट स्टेटस चेक करा. यामध्ये FTO जनरेट झाला असेल किंवा FTO will generated असे लिहिलेले दिसले असेल तर तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये आल्याचे समजावे. तुम्हाला ते कसे पाहता येईल?

सर्वप्रथम तुमच्या संगणकावर PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ उघडा.

मुख्यपृष्ठावर मेनू बार दिसेल. येथे 'फार्मर कॉर्नर' वर जा आणि लाभार्थी यादीवर क्लिक करा.

हे केल्यानंतर राज्य, जिल्हा, तहसील, गाव हे सगळे डिटेल्स यात भरा. एक नवीन यादी तुमच्या समोर येईल.

<div class="paragraphs"><p>PM Kisan Scheme Government Scheme</p></div>
गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण

त्रुटी कशा तपासायच्या ते जाणून घ्या...

1. सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या संगणकावर https://pmkisan.gov.in/ पोर्टल उघडा.

2. येथे तुम्हाला पेमेंट सक्सेस टॅब अंतर्गत भारताचा नकाशा दिसेल.

3. डॅशबोर्ड खाली लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.

4. तुम्ही त्यावर क्लिक करताच तुम्हाला एक नवीन पेज उघडलेले दिसेल.

5. हे व्हिलेज डॅशबोर्डचे पृष्ठ आहे, यामुळे तुम्हाला तुमच्या गावाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यास मदत होईल.

6. सर्व प्रथम आपले राज्य निवडण्याचे काम करा. तुम्ही गोवाचे असल्यास गोवा राज्य निवडा.

7. राज्य निवडल्यानंतर, तुमच्या जिल्ह्याचे नाव, नंतर तहसील आणि नंतर तुमच्या गावापर्यंत पोहोचा.

8. यानंतर शो बटणावर क्लिक करा.

9. यानंतर, तुम्हाला ज्या गावाबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करण्याचे काम करा.

10. हे केल्यावर संपूर्ण तपशील तुमच्या समोर दिसतील.

टीप: गाव डॅशबोर्डच्या खाली चार बटणे दिसतील. किती शेतकऱ्यांचा डेटा पोहोचला हे जाणून घ्यायचे असेल, तर Data Received वर क्लिक करा. ज्या शेतकऱ्याचे पैसे बाकी आहेत, ते दुसऱ्या बटणावर क्लिक करा.

नववा हप्ता ऑगस्ट 2021 मध्ये जारी करण्यात आला

पीएम-किसानचा नववा हप्ता ऑगस्ट 2021 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचला आहे. आज जाहीर झाल्यानंतर या योजनेंतर्गत आतापर्यंत 1.8 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पीएम-किसान योजनेची घोषणा फेब्रुवारी 2019 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या अंतर्गत, पहिला हप्ता डिसेंबर, 2018 ते मार्च, 2019 या कालावधीसाठी जारी करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com