गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण

या कपातीचा फायदा रेस्टॉरंट मालकांना आणि लहान व्यावसायिकांना होईल
LPG gas

LPG gas

Dainik Gomantak
Published on
Updated on

तेल आणि गॅस कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात दिलासादायक बातमी दिली आहे. कंपन्यांनी त्यांच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 102.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतील ही कपात 1 जानेवारी 2022 पासून लागू झाली आहे. या कपातीचा फायदा रेस्टॉरंट (Restaurant) मालकांना आणि लहान व्यावसायिकांना होईल.

<div class="paragraphs"><p>LPG gas </p></div>
Vaishno Devi Stampede Impact: चेंगराचेंगरीत स्वतःचा बचाव कसा करायचा?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता दिल्लीत 1998.50 रुपये असेल. गेल्या महिन्यात 1 डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर या सिलिंडरची किंमत 2101 रुपये करण्यात आली. 2012-13 नंतर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत झालेली ही दुसरी सर्वाधिक वाढ होती. कंपन्यांनी त्यांच्या इतर घरगुती वापरासाठी सिलिंडरच्या किमतीत कोणतीही कपात केलेली नाही. 14.2 किलो, 5 किलो आणि 10 किलो सिलिंडरच्या किमती पूर्वीप्रमाणेच राहतील.

<div class="paragraphs"><p>LPG gas </p></div>
Haryana: भिवानीमध्ये भीषण अपघात! खाण परिसरात डोंगर कोसळल्याने 10 ते 15 जण बेपत्ता

गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरपूर्वी 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 266 रुपयांनी वाढली होती. त्यानंतर या सिलिंडरची किंमत 2000.50 इतकी झाली. मात्र, आता यात कपात केल्याने त्याचा ग्राहकांना नक्कीच काही फायदा होणार आहे. प्रत्येक राज्य (State) आणि केंद्रशासित प्रदेशात एलपीजीच्या (LPG) किमतीचा आढावा घेतला जातो. मागील वर्षीच 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 43 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर 6 ऑक्टोबर रोजी त्यात 2.5 रुपयांची कपात करण्यात आली. यापूर्वी 19 सप्टेंबर रोजी अशा सिलिंडरच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com