जगभरातील राष्ट्रांच्या तुलनेत भारतीयांमध्ये सोन्याचे दागिने खरेदीचा अधिक कल असल्याचे स्पष्ट आहे. देशाची अर्थवव्यस्था मंदीत असो अथवा तेजीत असो, दागिने खरेदीचे प्रमाण अधिक ठेवत त्यावर शिक्का मोर्तब ही केले आहे. आता मंदीच्या भीतीने ही नागरिकांनी सोन्याला गुंतवणूकीचा सुरक्षित मार्ग म्हणून ही स्विकारला आहे.
( price of gold and silver hike in market again know latest price in the country)
अमेरिकेने जीडीपी वाढीचे आकडे जाहीर करताच परदेशी बाजारात सोन्याच्या किमतींनी उचल खाल्ली. या किंमती 3 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचल्या आहेत. तर डिसेंबरच्या किंमती 1785 डॉलरच्या जवळ आहे. मंदीच्या भीतीने सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढला. मागणी वाढल्याचा परिणाम ही त्वरीत दिसून आला. सोन्याच्या किंमतीत ही वाढ झाली.
आज 22 कॅरेट सोन्याची किंमती 47,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या संकेतस्थळानुसार, चांदीचा आजचा भाव 58,000 रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे. चांदीची घसरण थांबली असून गेल्या दोन दिवसात चांदीचे भाव वधरल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरवाड्यात सोन्याच्या दरात घसरण आणि तेजी दिसून आली होती.
देशांतर्गत बाजारातही भाव वाढले
परदेशी बाजारातील वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारातहीदिसून येत आहे. कमोडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याची किंमत 51700 रुपयांच्या जवळ आहे, गेल्या आठवड्यात MCX वर किंमत 49703 रुपये प्रति 10 ग्रॅम या नीचांकी पातळीवर पोहोचली होती आणि तिथून किंमत सुमारे 2000 रुपयांनी वाढली आहे. जगभरात आर्थिक आव्हाने वाढली की सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढते. त्यामुळेच मंदीच्या भीतीने सोन्याच्या दरात मोठी झेप घेतली आहे.
राज्यातील चार शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,200 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,490 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये इतका असेल.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,230 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 580 रुपये आहे.काल हा दर 565 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक
24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.