एसयूव्ही (Sport Utility Vehicle) कारला भारतात खूप पसंत करतात. यामागील कारण म्हणजे पॉवर आणि कारमधील मोकळी जागा उपलब्ध असते. मात्र जर एखादी एसयूव्ही महाग असेल, तर याचा अर्थ असा नाही की ती सुरक्षित असेलच. कारण ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये (Global NCAP Crash Test) त्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचणीत 5 स्टार रेटिंग प्राप्त करणारी एसयूव्ही ही एकमेव भारतातील SUV कार आहे जी भारतात खूप पसंत केली जाते. ही SUV महिंद्रा XUV 300 आहे जी परवडणारी सामान्य माणसांना परवडणारी तसेच प्रशस्त आहे. आपण या SUVचे TOP आणि Base मॉडेलबद्दल जाणुन घेणार आहोत. (Price, features And Details of the Mahindra SUV 300)
महिंद्रा XUV 300 च्या बेस मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर, या मॉडेलचे नाव W4 व्हेरिएंट आहे. महिंद्रा हे एक्सयूव्हीचे ते बेस मॉडेल आहे जे आपण टॉप किंवा सेकंड टॉप मॉडेलपेक्षा खूपच मॉडेलपेक्षा खुप कमी किंमतीत खरेदी करू शकतो. 7,6363 रुपयांपासुन या कारच्या किमतीला सुरूवात होते.
इंजिन आणि पॉवरचा विचार केला तर, महिंद्रा एक्सयूव्ही 300 डब्ल्यू 4 व्हेरिएंटमध्ये 1197 सीसी पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. जे 5000 RPM वर 108.59 HP आणि 2000-3500 RPM वर 200 NM टॉर्क तयार करते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह सुसज्ज आहे. ही एक 2 व्हील ड्राईव्ह 5 सीटर कार आहे ज्यामध्ये आपले छोटे कुटुंब सहज बसू शकते.
कारच्या Specificationचा विचार केल्यास, या SUVमध्ये इलेक्ट्रिकली चालित HVAC, सेंट्रल लॉकिंग, 17.78 सेमी टच स्क्रीन इंफोटेनमेंट, मोनोक्रोम इन्फोटेनमेंट डिस्प्ले, Blue sense Application, मायक्रो हायब्रिड टेक्नॉलॉजी, टायर पोजीशन डिस्प्ले, फ्रंट आणि रियर पॉवर विंडोज, उंची समायोज्य फ्रंट सीट बेल्ट, इलेक्ट्रिक फीचर्समध्ये टेलगेट रीलिझ, 4 स्पीकर्स, सेंटर रूफ लॅम्प, 12 व्ही एक्सेसरीज सॉकेट, स्टोरेजसह पॅड फ्रंट आर्मरेस्ट, बॉटल होल्डर (सर्व दरवाज्यांना), पॉवर विंडो ऑपरेशन्स, यूएसबी चार्जिंग पॉइंट्स, टच लेन चेंज इंडिकेटर आणि स्मार्ट स्टीयरिंग सिस्टम आहे. विशेष म्हणजे सर्व 4 डिस्क ब्रेक आणि सर्व 4 पॉवर विंडो सेटअप देखील उपलब्ध आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.