Flying Car: हवेत उडणारी कार कधी येईल, किंमत किती असेल? जाणून घ्या

Flying Car When will the flying car arrive what will be the price Find out
Flying Car When will the flying car arrive what will be the price Find out
Published on
Updated on

फ्लाईंग कार (Flying Car) अर्थात हवा मध्ये उडणारी कार… असं ऐकलं की मन रोमांचित होते. प्लाईंग कारविषयी आपण अनेकदा चर्चा ऐकत असतो. जगभरातील बर्‍याच कार बनवणाऱ्या कंपन्या फ्लाईंग कार बनवण्याविषयी दावा करत आल्या आहेत. आपण त्यासंबंधी बऱ्याचदा चर्चाही करताना दिसतो. आपण उडणाऱ्या कारविषयी बऱ्याचदा वाचलं देखील आहे. मात्र ही कार कशाप्रकारची असेल आणि कधीपर्यंत येणार हा प्रश्नच आहे. (Flying Car When will the flying car arrive what will be the price Find out)

काही महिन्यांपूर्वी लवकरच प्लाईंग कार लॉन्च होणार असल्याची माहिती अनेक माध्यमांनी दिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सादर करण्यात आलेल्या एका अहवालात सांगण्यात आले होते की, फ्लाईंग कार बनवण्यासाठी प्रसिध्द असणारी डच कंपनी पीएएल-व्ही (PAL-V) ‘लिबर्टी’ नावाची व्यवसायिक कार(Commercial Flying Car) बनवणार आहे. युरोपमध्ये ही कार चालवण्यासाठी परवानगी सुध्दा देण्यात आली आहे. पीएएल-व्ही कंपनीच्या लिबर्टी कारने नुकतीच प्राथमिक चाचणी पास केली आहे. अधिकृत परवान्यानुसार कारला रस्त्यावर आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. फ्लाईंग कारच्या किंमतींविषयी जाणून घेतल्यास तर लिबर्टी कमर्शियल फ्लाईंग कारची किंमत तब्बल 3.99 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 2.92 कोटी रुपये (+ कर) च्या रेंजमध्ये असेल.. कंपनी ने टेस्ट प्रोटोटाइपचं वर्ष 2012 मध्ये ही कार जमिन आणि हवे मध्ये चालवण्यात आली होती.

तेव्हापासून त्याचं व्यवसायिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने काम चालू आहे. ही कार 2015 पासून युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीचं प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे. 2022 पर्यंत प्लाइंग कार बाजारात येणार असल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. पीएएल-व्ही कंपनीच्या लिबर्टी फ्लाईंग कारमध्ये ड्युअल इंजिन असेल. या कारचे वजन 660 किलो असणार आहे. या कारमध्ये केवळ दोनच व्यक्ती बसू शकणार आहेत.  कारच्या स्टीयरिंगच्या विषयी बोलायचं झाल्यास ती अगदी अगदी स्मूथ आहे. या कारच्या वेगाबद्दल बोलायचं झाल्यास 9 सेकंदात ही कार 100 किमी वेगाने धावू शकते. जमिनीवर त्याची अधिकतम गती 160 किमी प्रतितास असेल तर हवेतील अधिकतम वेग 180 किमी प्रतितास असेल. 

भारतात प्लाइंग कारचे लवकरच उत्पादन होणार 

कंपनीच्या म्हणण्यानुसार या कारसाठी ड्युअल परवाना आवश्यक असेल. ड्रायव्हिंग आणि उड्डाण परवाने हे दोन्ही चालविणे व उड्डाण करणे आवश्यक आहे. पीएआर-व्ही फ्लाय ड्राईव्ह अ‍ॅकॅडमीमध्ये जायरोप्लेन फ्लाईंग परवान्यासाठी प्रशिक्षण सुरु झाले आहे. डच कंपनी पीएएल-व्ही यांनी आपल्या एका उत्पादन केंद्रासाठी गुजरात सरकारशी करार केला आहे. असे म्हटले जात आहे की, या मोटारींचे उत्पादन गुजरातमध्येही केले जाईल आणि येथे बनवलेल्या उड्डाण कार युरोपीय देशांमध्ये निर्यात केल्या जातील. सध्या भारतात कधी येईल, याचा निर्णय झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com