LIC PMVVY: विवाहित असाल तर तुम्हाला मिळू शकते 18,500 मासिक पेन्शन, असा घ्या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांसाठी आहे.
LIC PMVVY
LIC PMVVYDainik Gomantak
Published on
Updated on

मोदी सरकारद्वारे चालवली जाणारी प्रधानमंत्री वय वंदना योजना म्हणजेच LIC PMVVY (प्लॅन क्र. 856) खरेदी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात, जर केंद्र सरकारने LIC PMVVY योजना खरेदी करण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला नाही, तर ही पेन्शन योजना 1 एप्रिल 2023 पासून अखेदी करता येणार नाही.

LIC PMVVY
Ration Card 2023: मोठा निर्णय! केवळ हेच लोक बनवू शकणार राशनकार्ड, 'ही' आहे प्रक्रिया

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांसाठी आहे. विमा कंपनी LIC द्वारे विकली जाणारी आणि केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी प्रधानमंत्री वय वंदना योजना 60 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हमीभावाने मासिक पेन्शन मिळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2020 मध्ये PMVVY योजनेत सुधारणा केली. 26 मे 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रधानमंत्री वय वंदना योजना (LIC PMVVY) नव्याने सुरू केली.

मासिक पेन्शनची हमी देणाऱ्या विशेष योजना खरेदी करण्याची शेवटची संधी 31 मार्च 2023 पर्यंत आहे. या योजनेवरील व्याज दर वर्षी 7.40 टक्के निश्चित केले आहे, गुंतवणूकीच्या रकमेवरील व्याज उत्पन्नाच्या आधारावर, गुंतवणूकदारांना मासिक पेन्शनचा लाभ मिळतो.

LIC PMVVY
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ घट, जाणून घ्या आजचे दर

विवाहित जोडपे म्हणजे पती आणि पत्नी दोघेही वयाच्या 60 नंतर या LIC PMVVY चा लाभ घेऊ शकतात. जर पती-पत्नी दोघांनी या योजनेत प्रत्येकी 15 लाख रुपये गुंतवले तर त्यांना निश्चित व्याज दराने 30 लाख रुपयांवर 2,22,000 रुपये वार्षिक व्याज उत्पन्न मिळेल. त्यानुसार, तुम्हाला दरमहा 18,500 रुपये मासिक पेन्शन म्हणून घेता येईल.

या योजनेत केवळ एका व्यक्तीने 15 लाखांची गुंतवणूक केली, तर त्याला वार्षिक सुमारे 1,11,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्याज उत्पन्नाचा लाभ मिळतो. या आधारावर, व्यक्तीला मासिक पेन्शनच्या रूपात रु.9250 चे उत्पन्न मिळते. PMVVY योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 वर्षांनंतर गुंतवणूकदाराला गुंतवणूकीची संपूर्ण रक्कम परत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com