PPF Scheme: पीपीएफ योजनेत सरकारने केला मोठा बदल, जाणून घ्या नवे नियम!

PPF Scheme Latest Update: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PPF Scheme Latest Update: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. तुम्हीही पीपीएफ अपडेट स्कीममध्ये पैसे गुंतवले असतील किंवा गुंतवण्याची योजना असेल तर आता केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. सरकार वेळोवेळी सरकारी योजनांमध्ये बदल करत असते. जर तुम्हाला या नवीन नियमांची माहिती नसेल तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. पीपीएफ योजनेच्या नियमांमध्ये सरकारने काय बदल केले आहेत ते जाणून घेऊया...

तुम्ही या योजनेत कमी रुपयांतही गुंतवणूक करु शकता

जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही कमी पैशात या योजनेचा लाभ घेऊ शकता. अशा योजनांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित असतात. यामध्ये सरकारला Government) 7.10 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे.

Prime Minister Narendra Modi
PPF Scheme बाबत मोठी बातमी, आता सरकार देणार एवढी मोठी रक्कम; थेट खात्यात येणार पैसे!

महिन्यातून एकदा पैसे जमा केले जातात

तुम्ही PPF मध्ये किमान 1 वर्षात 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक (Investment) करु शकता. जर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत PPF मध्ये 1 वर्षात जमा केले तर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात दरमहा पैसे जमा करु शकता.

15 वर्षानंतरही खाते बंद होणार नाही

15 वर्षांनंतर त्यातील गुंतवणूक थांबते. पण जर तुम्हाला यामध्ये अधिक गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 15 वर्षांनंतरही या योजनेत गुंतवणूक करु शकता, परंतु त्यानंतर तुम्ही 1 वर्षातून एकदाच पैसे काढू शकता.

Prime Minister Narendra Modi
PPF Saving Scheme: सरकारी आदेश! पीपीएफ खातेदारांना करावे लागेल 'हे' काम, अन्यथा...

खाते कसे उघडायचे

पीपीएफ खाते उघडण्यासाठी तुम्हाला फॉर्म-1 सबमिट करावा लागेल. जर तुम्हाला 15 वर्षानंतरही गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला फॉर्म-4 मध्ये अर्ज करावा लागेल.

कर्जाचा लाभ मिळेल

पीपीएफ खात्यावर तुम्ही सहज कर्ज मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या PPF खात्यातील फक्त 25% रक्कम कर्ज मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com