PPF Saving Scheme: सरकारी आदेश! पीपीएफ खातेदारांना करावे लागेल 'हे' काम, अन्यथा...

PPF Saving Scheme: सरकारकडून अनेक बचत योजना राबवल्या जात आहेत. या बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचाही समावेश आहे.
PPF Saving Scheme
PPF Saving SchemeDainik Gomantak

PPF Saving Scheme: सरकारकडून अनेक बचत योजना राबवल्या जात आहेत. या बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचाही समावेश आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीद्वारे, गुंतवणूकदार (Investors) दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करु शकतात आणि त्यांच्या गुंतवणुकीवर चांगले व्याज देखील मिळवू शकतात.

मात्र, तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करत असाल तर एका गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला मोठा फटका सहन करावा लागू शकतो.

पीपीएफ अकाउंट

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते असलेल्या व्यक्तींना त्यांच्या गुंतवणुकीचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी 5 एप्रिलपूर्वी आर्थिक वर्ष 2023-24 साठी त्यांना पैसे जमा करावे लागतील.

या आर्थिक वर्षासाठी 5 एप्रिल नंतर PPF खात्यात जमा केल्यास, खातेदाराला PPF शिल्लकपेक्षा कमी व्याज मिळेल. कारण पीपीएफ योजनेच्या नियमांनुसार महिन्याच्या पाच तारखेला आणि महिन्याच्या शेवटी पीपीएफ खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेच्या आधारावर व्याज मोजले जाते.

PPF Saving Scheme
Money Saving| PPF, EPF किंवा पोस्ट ऑफिसमधील कुठे जमा होतो तो निधी, ज्यावर कोणी दावा करत नाही!

पीपीएफ स्कीम

त्यामुळे जर एखादी व्यक्ती एकरकमी गुंतवणूक (Investment) करत असेल तर 5 एप्रिलपर्यंत पीपीएफ खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री करा. 5 एप्रिलपर्यंत पीपीएफ खात्यात रक्कम जमा केल्यास व्याज जास्त असेल. याशिवाय, महिन्याच्या आधारे पीएफमध्ये रक्कमही जमा केली जाते.

PPF Saving Scheme
PPF Scheme बाबत केंद्र सरकारने दिली खूशखबर, पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आनंदी-आनंद!

पीपीएफ व्याज

पीपीएफ योजनेचा नियम पुढे सांगतो की, व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते, परंतु आर्थिक वर्षाच्या शेवटी ते जमा केले जाते. म्हणून, जर एखाद्याने PPF खात्यात मासिक पेमेंट केले तर जास्त व्याज मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी खात्यात पैसे जमा केले जातील याची खात्री करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com