Post Office Monthly Income Scheme: सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस बचत योजनांना अनेकजण प्राधान्य देत असतात. विशेष म्हणजे, पोस्टात प्रत्येक वयोगटासाठी बचत योजना उपलब्ध आहेत.
पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (POMIS) देखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला दरमहा एक निश्चित उत्पन्न मिळेल, आणि तुमचे पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित असतील.
5 वर्षांसाठी करावी लागणार गुंतवणूक
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे तर सुरक्षित आहेतच पण व्याजही बँकांपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर हा एक फायदेशीर सौदा ठरू शकतो.
पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही एका खात्याद्वारे किमान रु 1,000 आणि कमाल रु 9 लाख गुंतवू शकता. जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर त्यात गुंतवणूकीची कमाल मर्यादा 15 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
म्हणजेच पती-पत्नी दोघे मिळून 15 लाख रुपयांपर्यंत संयुक्त खात्यात गुंतवणूक करू शकतात. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक गुंतवणूक करू शकतात.
इतके मिळेल व्याज
तुम्हाला निवृत्तीनंतर किंवा त्यापूर्वी मासिक उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. या बचत योजनेवर सरकार सध्या ७.४ टक्के दराने वार्षिक व्याज देत आहे.
योजनेअंतर्गत, गुंतवणुकीवर मिळणारे हे वार्षिक व्याज 12 महिन्यांत वितरित केले जाते आणि त्यानंतर तुम्हाला ही रक्कम दरमहा मिळत राहते.
जर तुम्ही मासिक पैसे काढले नाहीत, तर ते तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहतील आणि तुम्हाला हे पैसे मूळ रकमेसह जोडून आणखी व्याज मिळेल.
असे मिळतील दरमहा 9,000 रुपये
आता तुम्हाला दरमहा 9,000 रुपयांपेक्षा जास्त नियमित उत्पन्न हवे असेल, तर त्यासाठी तुम्हाला संयुक्त खाते उघडावे लागेल. समजा तुम्ही त्यात 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 7.4 टक्के व्याजाची रक्कम 1.11 लाख रुपये होईल.
आता जर तुम्ही ही व्याजाची रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत समान प्रमाणात विभागली तर तुम्हाला दरमहा 9,250 रुपये मिळतील.
जर तुम्ही एकल खाते उघडून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर या योजनेत जास्तीत जास्त 9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 66,600 रुपये व्याज मिळतील, म्हणजेच दरमहा 5,550 रुपये उत्पन्न मिळेल.
जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फक्त राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खात्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल आणि भरलेल्या फॉर्मसह, खाते उघडण्यासाठी तुम्हाला विहित रक्कम रोख किंवा चेकद्वारे जमा करावी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.