पोस्टाची MIS स्कीम; पती-पत्नीला देते दुहेरी लाभ

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये तुम्हाला दरमहा कमाई करण्याची संधी देते.
Post Office MIS Scheme for Husband-wife
Post Office MIS Scheme for Husband-wifeDainik Gomantak
Published on
Updated on

नोकरीव्यतिरिक्त, जर तुम्हाला नियमित उत्पन्नाचा पर्याय स्वतंत्रपणे हवा असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवनूक करणे हा उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस MIS (पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम) योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय देते. विशेषत: अशा लोकांसाठी ज्यास्त ज्यांना पती-पत्नी दोघांचे एकत्रित खाते उघडायचे आहे. ही योजना पती-पत्नी दोघांनाही (MIS for Husband-wife) दुहेरी लाभ देते. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये तुम्हाला दरमहा कमाई करण्याची संधी मिळते, पण त्यासाठी तुम्हाला संयुक्त खाते उघडावे लागते. (Post office MIS scheme Gives double benefit to husband and wife)

Post Office MIS Scheme for Husband-wife
इलॉन मस्कला मिळवायचीये ट्विटरची मालकी, दिली 41 अरब डॉलरची ऑफर

वार्षिक 59,400 रुपये कमवता येणार

पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत, तुम्हाला संयुक्त खात्याद्वारे दुप्पट फायदा मिळतो. या योजनेद्वारे पती-पत्नी खात्यामध्ये वार्षिक 59,400 रुपये कमवू शकतात. त्याला दरमहा 4950 रुपये मिळणार आहेत.

मासिक उत्पन्न योजना काय असते?

एमआयएस योजनेत तुम्हाला सिंगल आणि जॉइंट दोन्ही पद्धतीने खाते उघडता येते. वैयक्तिक खाते उघडताना, तुम्ही या योजनेमध्ये किमान रु. 1,000 आणि कमाल रु. 4.5 लाख गुंतवू शकता. तथापि, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरतं आहे.

Post Office MIS Scheme for Husband-wife
रेल्वेच्या स्पष्टीकरणामुळे सर्व अफवांना पूर्णविराम

योजनेचे फायदे काय?

MIS ची चांगली गोष्ट म्हणजे दोन किंवा तीन लोक मिळून संयुक्त खाते देखील उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदाला समान दिले जातात तर तुम्ही कधीही संयुक्त खाते एकाच खात्यात रूपांतरित करू शकता आणि एकल खाते देखील संयुक्त खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. खात्यात कोणतेही बदल करण्यासाठी, सर्व खाते सदस्यांना संयुक्त अर्ज भरावा लागतो.

ही योजना कशी काम करते?

या योजनेत सध्या तुम्हाला 6.6 टक्के दराने वार्षिक व्याज मिळत असते. योजनेअंतर्गत, तुमच्या एकूण ठेवींवर वार्षिक व्याजाच्या आधारे परतावा मोजला जातो. आणि प्रत्येक महिन्यानुसार त्याचे 12 भाग केले जातात. तुम्ही दर महिन्याला तुमच्या खात्यात हा भाग मागू शकता त्याचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला मासिक आधारावर याची गरज नसेल, तर ही रक्कम मूळ रकमेत जोडल्यास त्यावर व्याज देखील मिळत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com