दिवसाला लाखोंची कमाई देणाऱ्या इंडियन बर्गरची 'जम्बो' गोष्ट

जम्बो किंग मुंबईच्या या सामान्य स्ट्रीट फूडला शेझवान, क्रिस्पी व्हेज, नाचोस आणि कॉर्न पालक सारख्या फ्लेवरमध्ये विकते. ज्या व्यक्तीने वडा पावला बर्गरच्या स्पर्धेत नेऊन ठेवले त्या व्यक्तीचे नाव आहे, धीरज गुप्ता.
Success Story Of Jumbo King
Success Story Of Jumbo King Dainik Gomantak
Published on
Updated on

Success Story Of Dheeraj Gupta Who Started Indian Burger Jumbo King:

बर्गर किंग, केएफसी आणि मॅकडोनाल्ड सारख्या अमेरिकन फास्ट फूड ब्रँड्सच्या शर्यतीत एक नाव खूप वेगाने पुढे आले आहे आणि पटकन आपले स्थान निर्माण केले आहे. आणि ते म्हणजे जम्बो किंग.

जर एखाद्याला भारतीय बर्गर खायचा असेल तर तो डोळे झाकून जम्बो किंगकडे धाव घेतो. हा मोठ्या आकाराचा वडा पाव अतिशय चवदार आहे. कारण जम्बो किंग मुंबईच्या या सामान्य स्ट्रीट फूडला शेझवान, क्रिस्पी व्हेज, नाचोस आणि कॉर्न पालक सारख्या फ्लेवरमध्ये विकते. ज्या व्यक्तीने वडा पावला बर्गरच्या स्पर्धेत नेऊन ठेवले त्या व्यक्तीचे नाव आहे, धीरज गुप्ता.

पार्श्वभूमी

धीरज यांनी पुण्यातील सिम्बायोसिस येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी हॉटेल, केटरिंग आणि मिठाईच्या दुकानांच्या आपल्या कौटुंबिक व्यवसायाला हातभार लावण्याचे ठरवले. थोडे दिवस काम केल्यानंतर 1999 मध्ये त्यांचा मिठाई निर्यातीचा व्यवसाय बंद करावा लागला.

यानंतर लंडन ट्रीपला गेलेल्या धीरज यांनी बर्गर किंग आणि मॅडोनल्ड्स फ्रँचायझींना भेटी दिल्ला. त्यामुळे धीरज यांना भारतात अशाच एका फास्ट-फूड व्यवसायाची कल्पना सुचली पण त्यात देसी चव होती. आणि त्याच क्षणाल धीरज यांनी जम्बो किंगचे आपल्या मनात उद्घाटनही केले.

पहिले पाऊल

धीरज यांनी आपल्या कुटुंबाकडून 2 लाख रुपये उसने घेतले आणि 23 ऑगस्ट 2001 रोजी फास्ट-फूड उद्योगात आपला पहिला पाय ठेवला. त्याचे पहिले आउटलेट मुंबईतील मालाड स्टेशनबाहेर होते, त्यांच्या दुकाणात मेनूमध्ये अनेक फास्ट-फूड आयटम होते. त्यांनी पत्नी आणि चार कर्मचाऱ्यांसह आउटलेट चालवले आणि पहिल्या सहा महिन्यांत, दिवसाला 3 ते 4 हजार रुपये कमावले.

वडा-पावच्या कमी किमतीमुळे लोकांच्या मागणीचे निरीक्षण करून, धीरज यांनी इतर सर्व पदार्थ बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे सर्व लक्ष वडा-पावकडे वळवले आणि अशा प्रकारे आज आपण ज्याला “जंबो किंग” म्हणून ओळखतो त्याला जन्म दिला.

Success Story Of Jumbo King
Success Story: कर्जबाजारी तरुण सहा वर्षात 55 हजार कोटींचा मालक, यशोगाथा पहिल्या क्रिप्टो अब्जाधीशाची

यशाची मालिका!

धीरज यांना पहिल्या आउटलेटमधून बक्कळ कमाई झाली. यानंतर त्यांनी पुन्हा त्यांच्या भावाकडून 5 लाख रुपये उसने घेतले आणि कांदिवलीमध्ये त्याचे दुसरे आउटलेट उघडले.

यातही यश मिळाल्यानंतर काही दिवसांतच अंधेरीमध्ये तिसरे आउटलेट उघडले. यातून मिळालेला पैसा धीरज यांनी निर्यात व्यवसायात लावला आणि पैशातून पैशांची कमाई सुरू केली.

नवी झेप

जसजसा वेळ गेला तसतसा जंबो किंग लोकांमध्ये लोकप्रिय आणि ओळखला जाऊ लागला. यानंतर धीरज यांनी फ्रँचायझी ऑफर करणे सुरू केले यासाठी ते 12-15 लाख रुपये आकारायचे.

2006 पर्यंत, धीरज यांनी एकट्याने संपूर्ण कंपनीची देखभाल केली परंतु नंतर 2007 मध्ये, त्यांनी त्यांच्या पहिल्या सीईओची नियुक्ती केली आणि धीरज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनले. त्यानंतर कंपनीला "फ्रेंचायझिंगमधील नवीन संकल्पना आणि सर्वात नाविन्यपूर्ण फ्रेंचायझी मॉडेल" म्हणून सन्मानित करण्यात आले.

Success Story Of Jumbo King
Success Story: इन्फोसिसमध्ये 9 हजारात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा पट्ट्या, आज आहे दोन कंपन्यांचा मालक

अशक्य काहीच नाही...

या व्यवसायात जम बसवल्यानंतर जम्बो किंगने कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या सर्वोत्तम धोरणामुळे, त्यांची विक्री सुमारे 30 टक्क्यांनी वाढली आणि ऑपरेटिंग खर्च सुमारे 40 टक्क्यांनी कमी झाला.

आज जंम्बो किंगने 10 लाख वडा-पाव विक्री करण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्याकडे सध्या 12 शहरांमध्ये 65 फ्रँचायझी आहेत. हे यश त्यांच्या व्यवसाय मॉडेल आणि सर्वोत्तम धोरणांमुळे शक्य झाले. आज धीरज जम्बो किंगच्या माध्यमातून दिवसाला लाखो रुपये कमावता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com