Union Budget 2022: शेअर मार्केटवर अर्थसंकल्पाचे सकारात्मक पडसाद

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2022-23 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Budget 2022 Stock Market Updates
Budget 2022 Stock Market UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Budget 2022 Stock Market:अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारचा हा 10वा आणि दुसऱ्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात सकारात्मक झाली. सकाळी शेअर मार्केटला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. BSE सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला असून निफ्टी (Nifty) 17,500 च्या जवळ उघडला आहे. (Budget 2022 Stock Market)

Budget 2022 Stock Market Updates
कोविडच्या तिसऱ्या लाटेनंतर अर्थसंकल्प ठरवणार अर्थव्यवस्थेची दिशा

अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण 2022 पासून शेअर बाजारात उत्साह दिसत आहे. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 1.4 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. अर्थसंकल्पापूर्वी सत्राच्या रॅलीत गुंतवणूकदारांनी सुमारे 4 लाख कोटी रुपयांची कमाई केली. आर्थिक सर्वेक्षणात पुढील आर्थिक वर्षात GDP 8-8.5 टक्के आणि 2021-22 मध्ये 9.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. या अहवालानंतर मार्केट सेंटीमेंट मजबूत झाली आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात तेजी दिसून येते.

Budget 2022 Stock Market Updates
अर्थसंकल्पात गोव्याच्या वाट्याला काय येणार? देशाची जीडीपी 8% राहण्याची शक्यता

जाणकारांच्या मते 8 ते 10 वर्षाच्या रेकॉर्डनुसार केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असल्याने भारतीय शेअर मार्केटमध्ये याचे सकारात्मक पडसाद दिसतात. तेव्हा आजही शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून यात आहे. याबाबतचे संकेत सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावरच दिसून आले. सेन्सेक्समध्ये जवळापास 1.15 टक्क्यांची उसळी दिसत असून निफ्टी देखील 1 टक्क्यांनी वधारला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com