Poco X7 Series: खास मोबाईप्रेमींसाठी पेशकश! पोकोच्या X7 सीरीजचं दणक्यात लॉन्चिंग, 50MP कॅमेरासह दमदार फीचर्स; जाणून किंमत

Poco X7 Series Launched: पोकोची नवीन X7 सीरीज मिड रेंजच्या सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या सीरीजमध्ये, तुमच्यासाठी Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G लॉन्च करण्यात आले आहेत.
Poco X7 Series: खास मोबाईप्रेमींसाठी पेशकश! पोकोच्या नव्या X7 सीरीजचं दणक्यात लॉन्चिंग; 50MP कॅमेरासह दमदार फीचर्स
Poco X7 SeriesDainik Gomantak
Published on
Updated on

पोकोची नवीन X7 सीरीज मिड रेंजच्या सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या सीरीजमध्ये, तुमच्यासाठी Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G लॉन्च करण्यात आले आहेत. पोको ब्रँडचे हे दोन्ही मिड-रेंज स्मार्टफोन कोणत्या फिचर्ससह लॉन्च करण्यात आले आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G हे दोन्ही स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Poco X7 5G Specifications

डिस्प्ले: पोको एक्स7 मध्ये 6.67 इंचाची एमोलेड स्क्रीन आहे, ज्यामध्ये 3डी कर्व्हड डिस्प्ले आहे, जो 3000 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 अल्ट्रा प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअप: फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी क्षमता: 5500 एमएएच बॅटरी 45 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन 47 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होतो.

Poco X7 Series: खास मोबाईप्रेमींसाठी पेशकश! पोकोच्या नव्या X7 सीरीजचं दणक्यात लॉन्चिंग; 50MP कॅमेरासह दमदार फीचर्स
OnePlus 13 Series अखेर भारतात लॉन्च! 6000 mAh बॅटरी, दमदार प्रोसेसरसह सुसज्ज; जाणून घ्या किंमत

Poco X7 5G Price in India

Poco X7 5G फोनच्या 8 GB RAM / 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. त्याचवेळी, 8 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा फोन कॉस्मिक सिल्व्हर, ग्लेशियर ग्रीन आणि यलो कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Poco X7 Pro 5G Specifications

डिस्प्ले: या प्रो व्हेरिएंटमध्ये 6.73 इंचाची AMOLED स्क्रीन आहे, जी 3200 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह आहे.

प्रोसेसर: पोकोने X7 सीरीजमध्ये लॉन्च केलेल्या प्रो व्हेरिएंटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8400 अल्ट्रा प्रोसेसर वापरला आहे.

कॅमेरा सेटअप: 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT-600 कॅमेरा सेन्सर असेल, तसेच, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. त्याचवेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 20 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

बॅटरी क्षमता: फोनला पॉवर देण्यासाठी 90 वॅट हायपरचार्ज सपोर्टसह 6550 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

Poco X7 Series: खास मोबाईप्रेमींसाठी पेशकश! पोकोच्या नव्या X7 सीरीजचं दणक्यात लॉन्चिंग; 50MP कॅमेरासह दमदार फीचर्स
OnePlus 13 launching: वन प्लस 12 पेक्षा 13 मध्ये काय खास, भारतात कधी होणार लॉन्च? पाच महत्वाचे मुद्दे

Poco X7 Pro 5G Price in India

Poco X7 Pro 5G फोनचे दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत, 8 GB RAM / 256 GB स्टोरेज आणि 12 GB RAM / 256 GB स्टोरेज. 8 जीबी व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आणि 12 जीबी व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही हा फोन तीन कलरमध्ये खरेदी करु शकाल - नेब्युला ग्रीन, ब्लॅक आणि यलो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com