
Affordable 5G Smartphone In India
मुंबई : देशात 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोन सेगमेंटची मोठी बाजारपेठ आहे. या सेगमेंटमध्ये 5G फोनची कमी होती, पण आता Poco ने ही कमी देखील भरुन काढली. Poco ने POCO M7 Pro 5G आणि C75 5G बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च करुन एकच खळबळ उडवून दिली. हे देशातील सर्वात स्वस्त 5G फोन आहेत.
मंगळवारी (17 डिसेंबर) दिल्लीतील (Delhi) एका कार्यक्रमात Poco C75 5G लॉन्च करण्यात आला. या फोनच्या फीचर्स आणि किंमतीबाबत अनेक संकेत मिळत होते, पण आता लॉन्च झाल्यानंतर सगळ चित्र स्पष्ट झालं आहे. चला तर मग या दोन्ही धासू फिचर्सवाल्या 5G फोनबद्दल जाणून घेऊया...
कंपनीने Poco M7 Pro 5G फोन लॉन्च केला आहे. यात 6.67 इंचाचा फुल एचडी एमोलेड डिस्प्ले आहे. हे गोरिल्ला ग्लास 5 सह येईल. यात MediaTek डायमेंशन 7025 अल्ट्रा चिपसेट आहे. हे 8 GB रॅमसह 128 GB आणि 250 GB स्टोरेज पर्यायांमध्ये येईल. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा Sony LYT 600 मुख्य कॅमेरा असेल. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. 5,110 mAh चा बॅटरी पॅक आहे आणि तो 45 वॉट फास्ट चार्जिंगसह येईल.
POCO M7 Pro 5G तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर लॉन्च ऑफर देखील आहे. SBI/HDFC/ICICI या बॅंकाच्या कार्डवर तुम्हाला 1000 रुपयाची सूट मिळते. याशिवाय, POCO M7 Pro 5G एक्सचेंज + 3 महिने नो-कॉस्ट EMI (NCE) लागू करुन ₹13,999 च्या विशेष लॉन्च किंमतीवर उपलब्ध आहे.
Poco C75 5G ची किंमत 7,999 रुपये एवढी आहे. यामध्ये कंपनी 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल मेमरी चा पर्याय देत आहे. त्याची ऑनलाइन विक्री गुरुवारी (19 डिसेंबर) दुपारी 12 वाजता सुरु झाली. कंपनीचा दावा आहे की, सेगमेंटमधील हा पहिला फोन आहे, ज्यामध्ये सोनीचा कॅमेरा सेटअप आहे.
Poco C75 5G मध्ये 6.88-इंच टचस्क्रीन, Snapdragon 4S जनरेशन 2 चिपसेट आहे. त्याची मेमरी 128 GB पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा असेल. याशिवाय, एक सेकेंडरी लेन्स असेल. कंपनी सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देखील देत आहे. इतकेच नाहीतर 5,160 mAh ची बॅटरी देखील असेल.
तसेच, लावा कडे 8,000 रुपयांपेक्षा स्वस्त 5G फोन नाही, परंतु LAVA Blaze 2 5G ची किंमत या फोनच्या जवळपास आहे, हा फोन 8999 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय, Redmi A4 5G देखील आहे, जो सर्वात स्वस्त 5G फोन आहे, या फोनसाठी तुम्हाला 8498 रुपये मोजावे लागतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.