भारतातील Smartphone ला पहिल्यांदाच मिळणार 'असे' फिचर, iQOO 12 च्या प्री-बुकिंगसाठी ग्राहकांच्या उड्या

iQOO 12 खरेदी करण्याऱ्यांसाठी कंपनीने त्याचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून ते प्री-बुक करू शकता. प्री-बुकिंग ऑर्डरवर कंपनी ग्राहकांना डिस्काउंट ऑफरही देत ​​आहे.
iQOO 12 Pre booking
iQOO 12 Pre bookingDainik Gomantak

iQOO 12 Smartphone Launch In India:

iQ भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी 12 डिसेंबरला भारतात iQOO 12 सादर करणार आहे. विशेष बाब म्हणजे या स्मार्टफोनमध्ये अनेक फ्लॅगशिप लेव्हल फीचर्स मिळणार आहेत. iQOO 12 हा भारतात उपलब्ध असलेला पहिला स्मार्टफोन असेल जो Qualcomm Snapdragon 8 Gen 3 ने सुसज्ज असेल.

जर तुम्ही iQOO 12 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, कंपनीने त्याचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून ते प्री-बुक करू शकता.

प्री-बुकिंग ऑर्डरवर कंपनी ग्राहकांना डिस्काउंट ऑफरही देत ​​आहे. यासोबत तुम्हाला भेटवस्तू मिळवण्याचीही संधी आहे.

iQ ने चिनी मार्केटमध्ये iQOO 12 फोन आधीच सादर केला आहे. आता कंपनी तो भारतात लॉन्च करणार आहे.

हा स्मार्टफोन तुम्ही iQOO.com किंवा Amazon.in वरून बुक करू शकता. प्री-बुक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम प्राधान्य पास घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला ९९९ रुपये मोजावे लागतील. मात्र ही रक्कम परत करण्यायोग्य असेल.

प्री-बुकिंगसाठी, तुम्हाला Amazon किंवा IQ Store वरून प्रायोरिटी पास मिळेल.

iQOO 12 Pre booking
10 लाखांचा दंड, तुरुंगवास आणि 90 दिवसांची मर्यादा... Sim Card खरेदी-विक्री करताना आता घ्यावी लागणार काळजी

लॉन्च करण्यापूर्वी किंमत लीक

भारतात लॉन्च होण्यापूर्वीच iQOO 12 ची किंमत चुकून Amazon India वर लीक झाली होती. मात्र, Amazonने आपली चूक सुधारली आणि तत्काळ साइटवरून तपशील काढून टाकला.

Amazon ने हा स्मार्टफोन हटवण्यापूर्वीच अनेक यूजर्सनी या स्मार्टफोनच्या किंमतीचा स्क्रीनशॉट घेतला होता.

लीकनुसार, कंपनी भारतात दोन प्रकारांमध्ये iQOO 12 लाँच करेल. पहिला प्रकार 12GB रॅमचा असेल ज्याची किंमत 52,999 रुपये असू शकते. दुसरा प्रकार 16GB रॅमचा असेल ज्याची किंमत 57,999 रुपये असेल.

iQOO 12 Pre booking
Success Story: 3 वर्षे अन् 300 कोटींची कंपनी! भारतीय तरुणाची अमेरिका, जर्मनी, कॅनडा आणि यूके मध्ये करोडोंची कमाई

iQOO 12 मधील संभाव्य फिचर्स

  • iQOO 12 स्मार्टफोनमध्ये यूजर्सना 6.78 इंच AMOLED पॅनल डिस्प्ले मिळेल.

  • डिस्प्लेचे रिझोल्यूशन 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 2800 × 1260 पिक्सेल असेल. यामध्ये यूजर्सना 3000 nits पर्यंत ब्राइटनेस मिळेल.

  • तुम्हाला iQOO 12 मध्ये जलद प्रोसेसिंग मिळेल कारण कंपनीने त्यात Qualcomm चा नवीनतम Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला आहे.

  • तुम्ही या स्मार्टफोनवर एकाच वेळी अनेक अ‍ॅप्लिकेशन्स चालवू शकता कारण यूजर्सना 16GB पर्यंत RAM मिळेल.

  • स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यात 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज आहे.

  • हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित असेल जो FunTouchOS 14 वर काम करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com