Bank MCLR Rates 2023: सरकारी आणि खासगी बँकांमध्ये खाती असलेल्या करोडो ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. तुमचेही बँक खाते असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील.
ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँकेने MCLR चे दर वाढवले आहेत. त्यामुळे या बँकांमधील खातेदारांच्या ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. ICICI बँकेने काही कालावधीसाठी व्याजदरात कपात केली आहे, तर पंजाब नॅशनल बँकेने सर्व कालावधीसाठी व्याजदरात वाढ केली आहे.
खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेबद्दल बोलायचे झाल्यास, या बँकेने व्याजदरात कपात केली आहे, म्हणजेच ग्राहकांचा ईएमआय कमी झाला आहे. बँकेने ओव्हरनाइट व्याजदर 8.5 टक्क्यांवरुन 8.35 टक्के केला आहे.
याशिवाय 3 महिन्यांसाठीचे दरही 15 बेसिस पॉईंटने कमी केले आहेत. त्याचे दर 8.55 टक्क्यांवरुन 8.40 टक्क्यांवर आले आहेत.
त्याचबरोबर, आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) 6 महिने आणि एक वर्षाच्या कालावधीच्या व्याजदरांबद्दल बोलायचे झाल्यास बँकेने त्यात वाढ केली आहे. यामध्ये बँकेने 5 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. यामध्ये तुम्हाला 8.85 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.
देशातील सरकारी बँक पीएनबीने सर्व कालावधीसाठी व्याजदर वाढवले आहेत. PNB ने MCLR दर 10 बेसिस पॉईंटने वाढवले आहेत. बँकेचे नवे व्याजदर (Interest rate) 1 जूनपासून लागू झाले आहेत. PNB च्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने ओव्हरनाइट MCLR दर 10 बेस पॉईंट्सने वाढवला आहे, त्यानंतर व्याजदर 8 वरुन 8.10 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
याशिवाय, एक महिना, 3 महिने आणि 6 महिन्यांचे दरही वाढले आहेत. एक महिन्याचा व्याजदर 8.20 टक्के, 3 महिन्यांचा व्याजदर 8.30 टक्के, 6 महिन्यांचा व्याजदर 8.50 टक्के झाला आहे. याशिवाय, एक वर्षाचा MCLR दर 8.60 टक्के आणि 3 वर्षांचा MCLR दर 8.90 टक्के करण्यात आला आहे.
बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर आपण वेगवेगळ्या कालावधीच्या व्याजदराबद्दल बोललो तर कालपासून तुमचा ईएमआय वाढला आहे. यापुढे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. याशिवाय, ICICI बँकेने व्याजदरात कपात केली आहे, त्यामुळे तुमचा EMI कमी होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.