PM Kisan: शेतकऱ्यांना मोठा झटका, सरकारने केले नाही 'हे' काम

PM Kisan: केंद्र सरकारने नुकताच 2023 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी सरकारने अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
Framer
Framer Dainik Gomantak

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: केंद्र सरकारने नुकताच 2023 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी सरकारने अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

त्याचबरोबर अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणाही केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या काही अपेक्षा अजूनही पूर्ण झाल्या नसल्या तरी एका गोष्टीची शेतकर्‍यांना खूप आशा होती.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केला. 2023 च्या अर्थसंकल्पावर निराशा व्यक्त करताना, शेतकऱ्यांनी सांगितले की, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत मिळणार्‍या रकमेत वाढ होण्याची अपेक्षा होती.

Framer
PM Kisan च्या हप्त्याआधी आली आनंदाची बातमी, अमित शहांचे 'हे' पाऊल...

पीएम किसान

वास्तविक, अर्थसंकल्पापूर्वी (Budget) पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत मिळणार्‍या रकमेत वाढ होण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा होती. मात्र, या अर्थसंकल्पात सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही किंवा पीएम किसान अंतर्गत मिळणार्‍या रकमेतही वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.

पीएम किसान योजना

त्याचवेळी, शेतकऱ्यांनी महामारीच्या धक्क्यांनंतरही व्यापक अर्थव्यवस्थेला पाठिंबा देत स्थिर राहिलेल्या क्षेत्रासाठी एकूण खर्चात कपात करण्यावर प्रश्न उपस्थित केले. पीएम किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेसाठीचे वाटप पाच वर्षांतील सर्वात कमी होते. विशेष म्हणजे, चालू वर्षाच्या सुधारित अंदाजाप्रमाणेच ₹60,000 कोटी होते.

Framer
PM Kisan बाबत मोठी अपडेट, अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपतींनी दिली 'ही' माहिती

तीन हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 6,000 रुपये

पीएम किसान ही एक प्रमुख केंद्रीय योजना आहे, जी पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 6,000 रुपये रोख हस्तांतरणासाठी 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. बुधवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सरकारने पीएम-किसान योजनेअंतर्गत सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना एकूण 2.2 लाख कोटी रुपयांचे रोख हस्तांतरण केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com