PM Kisan Samman Nidhi Scheme 12th Installment Latest Updates: दिवाळीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. 17 ऑक्टोबर रोजी ते पीएम किसान सन्मान निधीचा (12th installment of PM Kisan Samman Nidhi Yojana) 12 वा हप्ता जारी करतील. जे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत, त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. ते वगळता इतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट पोहोचेल.
अपात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही
माहितीनुसार, किसान सन्मान निधी (12th installment of PM Kisan Samman Nidhi Yojana) चा 12 वा हप्ता सप्टेंबरमध्येच रिलीज होणार होता. मात्र पात्र शेतकऱ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी यामुळे विलंब झाला. आता सरकारने या योजनेतून अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वेगळे केले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना (Farmers) ही रक्कम मिळणार नाही. एकट्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) 21 लाख शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत, त्यामुळे यावेळी ही रक्कम त्यांच्या खात्यात येणार नाही. अशा शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून आधीच पाठवलेली रक्कमही परत मागितली जात आहे.
PM मोदी 17 ऑक्टोबरला रिलीज होणार
पडताळणीनंतर, सरकारने पीएम किसान पोर्टलवर पात्र आढळलेल्या सर्व शेतकऱ्यांचे डिटेल अपलोड केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 17 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात एक बटण दाबून ही करोडो रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये पोहोचतील. यावेळी सरकारने योजनेच्या 12व्या हप्त्याची (12th installment of PM Kisan Samman Nidhi Yojana) रक्कम जारी करण्यापूर्वी स्टेटस तपासण्यासाठी नियम बदलला आहे.
मोबाईल क्रमांकावरुन स्थिती तपासता येते
या योजनेत पूर्वी लाभार्थी शेतकरी पीएम किसान पोर्टलला भेट देऊन त्यांच्या मोबाईल क्रमांक किंवा आधार कार्डद्वारे स्टेटस पाहू शकत होते. यानंतर, सरकारने हा नियम लागू केला की केवळ आधार कार्डद्वारे उमेदवारांना त्यांचे स्टेटस तपासता येईल. आता पुन्हा एकदा नियमात बदल करण्यात आला असून केवळ त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुनच लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचे स्टेटस पाहता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता आधारद्वारे स्टेटस पाहणे शक्य होणार नाही. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एका वर्षात शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जातात. 2-2 हजार रुपये करुन ही रक्कम 3 पटीने दिली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.