PM Kisan eKYC: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) अंतर्गत, देशभरातील शेतकरी 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिली जाते. पीएम किसान योजनेतर्गंत आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर शेतकरी 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, मात्र काही शेतकरी या 13 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
हे शेतकरी वंचित राहू शकतात
पीएम किसानचा लाभ चार महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक (Bank) खात्यात हस्तांतरित केला जातो. दिवाळीपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक लाभाचा 12 वा हप्ता जारी केला होता. त्याचवेळी, 13 व्या हप्त्याची पाळी आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांचे (Farmer) पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केवायसी केले गेले नाही, ते 13 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
eKYC आवश्यक आहे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी EKYC करुन घेणे बंधनकारक आहे, अन्यथा ते योजनेच्या लाभापासून वंचित राहतील. eKYC पूर्ण करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा.
असे eKYC करा
सर्वप्रथम पीएम किसान वेबसाइटवर जा आणि फार्मर्स कॉर्नरवरील किसान ई-केवायसी लिंकवर क्लिक करा.
आधार क्रमांक टाकण्याचा पर्याय असेल. तिथे आधार क्रमांक टाका.
यानंतर कॅप्चा कोड टाका.
सर्च बटणावर क्लिक करा आणि तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करा. मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असावा.
आता एक OTP येईल. OTP एंटर करा. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
पीएम किसान योजना (PM KIsan Yojana)
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसीशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्याची इच्छा असल्यास, ते सीएससी किंवा वसुधा केंद्राला भेट देऊन ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करु शकतात. तथापि, बायोमेट्रिक प्रणालीद्वारे ई-केवायसी करण्यासाठी शुल्क आकारले जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.