PM Kisan Samman Nidhi Updates: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) च्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत मोदी सरकारने आतापर्यंत 2000 चे 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत. आता शेतकरी पुढच्या 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. परंतु आतापर्यंत या योजनेत (PM Kisan Samman Nidhi Yojana) अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊया सविस्तर...
1. कालबाह्य होल्डिंग मर्यादा
पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या सुरुवातीला फक्त तेच शेतकरी (Farmer) पात्र मानले जात होते, ज्यांच्याकडे 2 हेक्टर किंवा 5 एकर शेतीयोग्य जमीन होती. पण आता देशातील 14.5 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारने ही सक्ती रद्द केली आहे.
2. आधार कार्ड आवश्यक
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनाच मिळणार आहे. सरकारने लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे.
3. नोंदणी सुविधा
अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारने अनेक बदल केले आहेत. याअंतर्गत लेखपाल, कृषी अधिकारी यांच्याकडे फेऱ्या मारण्याची सक्ती शासनाने दूर केली आहे. आता शेतकरी घरबसल्या सहजपणे स्वतःची नोंदणी करु शकतात. तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक असल्यास, तुम्ही pmkisan.nic.in वर Farmer कॉर्नरवर जाऊन नोंदणी करु शकता. तसेच काही चूक झाली असेल तर ती तुम्ही स्वतः दुरुस्त करु शकता.
4. तुमचे स्टेटस जाणून घेऊ शकता
सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केलेला सर्वात मोठा बदल म्हणजे कोणताही शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन त्याच्या स्टेटसबद्दल माहिती मिळवू शकतो. नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस स्वतः तपासू शकता. आता तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस स्वतः तपासू शकता, तुमच्या बँक खात्यात किती हप्ता आला आहे.
5. किसान क्रेडिट कार्ड
आता या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड (KCC) देखील जोडण्यात आले आहे. म्हणजेच, आता पीएम किसानचे लाभार्थी सहजपणे KCC बनवू शकतात. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना केसीसीवर 4 टक्के दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जही मिळते.
6. मानधन योजनेचे फायदे
पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. या योजनेंतर्गत, शेतकरी पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देऊ शकतात. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सर्व प्रकारे लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
7. राशन कार्ड अनिवार्य
किसान योजनेंतर्गत आता लाभार्थ्यांकडे राशनकार्ड असणे आवश्यक आहे. म्हणजेच, आता फक्त अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, जे त्यांच्या अर्जात राशनकार्डचा तपशील टाकतील.
8. KYC अनिवार्य झाले
आता पीएम किसान योजनेंतर्गत केवायसी करणे अनिवार्य झाले आहे. तुम्ही अजून KYC केले नसेल तर ते लगेच करुन घ्या. अन्यथा, तुम्हाला नंतर हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.