PM Kisan: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट, 13 वा हप्ता घेण्यासाठी या 2 गोष्टी करा; नाहीतर...

PM Kisan Yojana Latest Update: जर तुम्हाला 13 व्या हप्त्याचे पैसे (pm kisan 13th installment) मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी या 2 गोष्टी करणे अनिवार्य आहेत
PM Kisan
PM KisanDainik Gomantak
Published on
Updated on

PM Kisan Yojana: देशातील करोडो लोकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. जर तुम्हालाही 13 व्या हप्त्याचे पैसे (pm kisan 13th installment) मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी या 2 गोष्टी करणे अनिवार्य आहेत. जर तुम्ही हे महत्त्वाचे काम केले नाही तर तुमच्या खात्यात 2000 रुपये येणार नाहीत.

शासनाने आदेश जारी केला

ज्या शेतकऱ्यांनी (Farmer) ई-केवायसी (पीएम किसान ई-केवायसी) आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी केलेली नाही, त्यांच्या खात्यावर हे पैसे हस्तांतरित केले जाणार नाहीत, अशी माहिती कृषी अधिकारी आणि सरकारच्या वतीने आदेश जारी करुन देण्यात आली आहे. याशिवाय ज्यांनी या दोन्ही गोष्टी अपडेट केल्या नाहीत, त्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.

PM Kisan
PM Kisan: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, 13 व्या हप्त्यापूर्वी सरकारची मोठी घोषणा

eKYC कसे करावे?

तुमची EKYC अजून झाली नसेल, तर तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. यानंतर, फार्मर्स कॉर्नर असलेल्या सेक्शनमध्ये, EKYC वर क्लिक करा. आता तुमचा तपशील टाकल्यानंतर तुम्हाला OTP टाकावा लागेल. तुम्ही OTP टाकताच तुमचे eKYC अपडेट केले जाईल.

जमिनीच्या नोंदींची पडताळणी आवश्यक

याशिवाय, जमिनीच्या नोंदींची पडताळणी झाली नसेल तर ते त्वरित करुन घ्या. तुम्ही क्षेत्राच्या पटवारी किंवा जिल्हा/ब्लॉकच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे करु शकता.

PM Kisan
PM Kisan Yojana: मोठा झटका! शेतकऱ्यांना परत करावे लागणार 2000 रुपये, यादी जाहीर

13 वा हप्ता कधी जारी होईल?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता लवकरच येणार आहे. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांना वर्षाचा पहिला हप्ता दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. त्याच वेळी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान हस्तांतरित केले जातात. त्यानुसार डिसेंबरमध्ये पीएम किसानचा (PM Kisan) 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com