Reserve Bank of India: भारतीय रिझर्व्ह बँक तुम्हाला 4.62 कोटी रुपये देत आहे? तुम्हालाही असा काही मेल आला आहे का, ज्यामध्ये 12500 रुपये भरा आणि त्या बदल्यात तुमच्या खात्यात 4 कोटी 62 लाख रुपये येतील असा दावा केला जात आहे. तुमच्या मेलमध्ये असा काही मेल आला असेल तर त्याआधी जाणून घ्या काय आहे संपूर्ण सत्य-
दरम्यान, हा मेल पाहिल्यानंतर पीआयबीने त्यात तथ्य तपासले. त्यांच्या फॅक्ट चेकद्वारे हा मेल खरा आहे की खोटा हे तपासण्यात आले आहे.
दरम्यान, या मेलची सत्यता तपासल्यानंतर पीआयबीने हा मेल पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. तुम्हाला असा काही मेल आला असेल तर तो डिलीट करा. यासोबतच असे मेल इतर कोणाशीही शेअर करु नका. आजकाल सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हायरल मेसेज दिसत आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना त्यांची वैयक्तिक माहिती विचारली जाते.
दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेकडून कोणाचीही वैयक्तिक माहिती मागितली जात नाही. यासोबतच ग्राहकांना त्यांची वैयक्तिक माहिती कोणाशीही आणि सोशल मीडियावर शेअर करायची नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
पीआयबीने ट्विटमध्ये सांगितले की, मेलमध्ये लिहिले आहे की आरबीआयला 12500 रुपये भरा आणि तुमच्या खात्यात 4 कोटी 62 लाख रुपये येतील.
आरबीआय (RBI) कोणत्याही व्यक्तीचे कोणतेही खाते ठेवत नाही. याशिवाय तुम्हाला आरबीआयकडून लॉटरी जिंकणे किंवा परदेशातून पैसे मिळणे असा कोणताही मेसेज आला, तर त्याच्या भानगडीत पडू नका. याशिवाय, लॉटरी फंड इत्यादींच्या बक्षीसाची माहिती देणारा कोणताही ईमेल आरबीआय पाठवत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.