Paytm Payments Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी उद्याची अंतिम मुदत; जाणून घ्या कोणत्या सेवा चालू राहणार आणि कोणत्या बंद?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने Paytm Payments Bank Ltd (PPBL) वर लादलेल्या निर्बंधांमुळे 15 मार्च 2024 नंतर अनेक Paytm सेवा काम करणे बंद करतील.
Paytm
PaytmDainik Gomantak

Paytm Payments Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने Paytm Payments Bank Ltd (PPBL) वर लादलेल्या निर्बंधांमुळे 15 मार्च 2024 नंतर अनेक Paytm सेवा काम करणे बंद करतील. रेग्युलेटरी नियमांचे पालन न केल्यामुळे RBI ने जानेवारीच्या अखेरीस पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातली, ज्यामुळे PBBL ला 29 फेब्रुवारी 2024 नंतर नवीन ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारण्यापासून प्रतिबंधित केले होते. मात्र, ही मुदत नंतर 15 दिवसांनी वाढवून 15 मार्च 2024 करण्यात आली.

चला तर मग, 15 मार्च 2024 नंतर कोणत्या सेवा चालू राहणार आणि कोणत्या बंद होणार याबद्दल जाणून घेऊया..

Wallet Top-ups And Transfers - 15 मार्च 2024 नंतर कॅशबॅक किंवा रिफंड वगळता ग्राहक त्यांच्या वॉलेटमध्ये टॉप-अप किंवा फंड ट्रान्सफर करु शकणार नाहीत.

Deposit into Paytm Payments Bank Accounts - 15 मार्च 2024 नंतर ग्राहकांच्या पेटीएम पेमेंट्स बँक खात्यांमध्ये व्याज, कॅशबॅक, स्वीप-इन किंवा परतावा वगळता कोणत्याही ठेवी स्वीकारल्या जाणार नाहीत.

Salary Credit - अंतिम मुदतीनंतर पेटीएम पेमेंट बँक खात्यांमध्ये सॅलरी क्रेडिट स्वीकारले जाणार नाहीत.

Subsidies Or Direct Benefit Transfers - अनुदानांचे क्रेडिट किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 15 मार्च 2024 नंतर बंद होणार.

FASTag recharge - 15 मार्च 2024 नंतर ग्राहक पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेला FASTag रिचार्ज करु शकणार नाहीत.

Balance Transfer For FASTag - पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेल्या जुन्या FASTags मधून बॅलन्स ट्रान्सफर करता येणार नाही.

Transfers into Paytm Payments Bank accounts via UPI/IMPS - 15 मार्च 2024 नंतर ग्राहक UPI/IMPS द्वारे त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करु शकणार नाही.

UPI Services - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या दिशानिर्देशानंतर 15 मार्च नंतर UPI सेवा पेटीएम आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या अधीन असेल.

Paytm
Paytm Payments Bank: बिनधास्त राहा! पेटीएमवरील कारावाईचा ग्राहकांना कोणताही धोका नाही, आरबीआयची हमी

या सेवा प्रभावित होणार नाहीत

Withdrawals from Paytm Payments Bank - ग्राहक त्यांच्या खात्यातून उपलब्ध बॅलन्समधून पैसे काढणे किंवा ट्रान्सफर करणे सुरु ठेवू शकतात. या लिमीटमध्ये डेबिट कार्ड व्यवहार देखील चालू राहणार.

Refunds - 15 मार्च 2024 नंतरही रिर्टन्स, कॅशबॅक, भागीदार बँकांकडून स्वीप-इन किंवा व्याज ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाऊ शकते.

Monthly Bill Auto-Deduction - खात्यात पुरेसा बॅलन्स असेपर्यंत लाइट बिल किंवा OTT सबस्क्रिप्शन यासारख्या मासिक खर्चासाठी वॉलेटचा वापर करता येणार.

Auto Debit For EMIs - जोपर्यंत खात्यात बॅलन्स उपलब्ध आहे, तोपर्यंत लोन EMI साठी ऑटो-डेबिटचा वापर करता येईल. परंतु ग्राहकांना सूचित केले आहे की, निर्धारित अंतिम मुदतीपूर्वी ईएमआय पेमेंटसाठी अन्य बँकेद्वारे पर्यायी व्यवस्था करावी.

Wallet Usage - ग्राहक त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँक वॉलेटमधील बॅलन्स इतर खात्यांमध्ये किंवा वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्यासह विविध व्यवहारांसाठी वापरु शकतात.

Wallet Closure And Balance Transfer - पूर्ण केवायसी वॉलेट्स असलेले ग्राहक PPBL शी संपर्क साधू शकतात किंवा त्यांचे बँकिंग ॲप वापरुन त्यांचे वॉलेट बंद करु शकतात आणि शिल्लक बॅलन्स दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करु शकतात.

FASTag Usage - पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेले FASTags उपलब्ध बॅलन्स संपेपर्यंत टोल भरण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तथापि, ग्राहकांना 15 मार्च 2024 पूर्वी दुसऱ्या बँकेकडून नवीन FASTag घेण्यास सांगण्यात आले आहे.

Withdrawals via UPI/IMPS - उपलब्ध बॅलन्स संपेपर्यंत ग्राहक UPI/IMPS वापरुन त्यांच्या पेटीएम पेमेंट बँक खात्यातून पैसे काढू शकतात.

Continued App Functionality - वापरकर्ते खात्री बाळगू शकतात की पेटीएम ॲपद्वारे ऑफर केलेल्या सर्व सेवा 15 मार्च 2024 नंतर कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु राहतील.

QR code, Soundbox, etc - Paytm चे QR कोड, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन पूर्णपणे कार्यरत राहतील, ज्यामुळे वापरकर्ते आणि व्यापारी दोघांसाठी व्यवहार सुनिश्चित होतील.

Services Such As Movie Tickets, etc - चित्रपट, कार्यक्रम आणि प्रवासाच्या विविध पद्धती (मेट्रो, फ्लाइट, ट्रेन, बस) यांच्या तिकीट बुकिंगसह पेटीएम ॲपवरील सर्व विद्यमान सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

Paytm
Paytm Fastag: पे-टीएम फास्टॅग यूजर्ससाठी महत्वाची बातमी; दोन दिवसात घ्यावा लागणार नवा टॅग, अन्यथा...

Utility bill payments - पेटीएम ॲपद्वारे वापरकर्ते डीटीएच किंवा ओटीटी सबस्क्रिप्शनचे रिचार्ज तसेच वीज, पाणी, गॅस आणि इंटरनेट यांसारख्या युटिलिटी बिलांची पूर्तता करु शकतात. हे ॲप सिलिंडर बुक करणे, गॅस बिल भरणे, अपार्टमेंटचे लाइट बिल आणि विमा प्रीमियम यासह विविध सेवांसाठी वापरता येईल.

Insurance Services - वापरकर्ते हेल्थसाठी विमा पॉलिसी खरेदी करु शकतात. तसेच, पेटीएम ॲपद्वारे विमा प्रीमियम भरु शकतात.

FASTag Services - पेटीएम पेमेंट्स बँक FASTags खरेदी करणे 15 मार्च नंतर शक्य होणार नाही, वापरकर्ते त्या तारखेपर्यंत त्यांचे FASTags रिचार्ज करु शकतात. हे ॲप HDFC बँक FASTags आणि इतर भागीदार बँकांसाठी रिचार्ज पर्याय देखील देते.

Investments And Gold - पेटीएम मनीद्वारे इक्विटी, म्युच्युअल फंड, एनपीएस मधील गुंतवणूक तसेच डिजिटल सोन्याचे व्यवहार सुरक्षित आणि पूर्णपणे कार्यक्षम आहेत.

Credit Card Payments - पेटीएम ॲपद्वारे वापरकर्ते त्यांच्या क्रेडिट कार्डच्या बिलांचा सोयीस्करपणे निपटारा करु शकतात.

दुसरीकडे, सध्याच्या PPBL खात्यांमधील सेटलमेंट 15 मार्च 2024 पर्यंत सुरळीतपणे चालू राहतील, या तारखेनंतरही खात्यातील बॅलन्स कायम राहील. व्यापारी पेटीएम फॉर बिझनेस ॲपद्वारे त्यांचे सेटलमेंट बँक खाते PPBL वरुन दुसऱ्या बँकेत सहजपणे बदलू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com