Loan on PAN Card: पॅन कार्डवर किती वैयक्तिक कर्ज मिळणार, त्याच्या अटी काय आहेत?

आर्थिक अडचणी टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुमच्या पॅन कार्डद्वारे वैयक्तिक कर्ज घेणे.
Pan Card
Pan CardDainik Gomantak
Published on
Updated on

Loan on PAN Card: तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वैयक्तिक कर्ज घेणे. पर्सनल लोनसाठी बँकेत अर्ज करून कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात, असे अनेकदा दिसून येते. या अडचणी टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुमच्या पॅन कार्डद्वारे वैयक्तिक कर्ज घेणे.

तुमच्या पॅन कार्डच्या तपशीलावर आधारित बहुतांश बँका 50,000 रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देतात. कर्ज वाटप करणार्‍या NBFC बजाज फिनसर्व्हच्या मते, KY नियमांनुसार, तुम्ही तुमचे पॅन कार्ड देऊन कोणत्याही अडचणीशिवाय वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि बँका तुमची क्षमता, उत्पन्न आणि परतफेडीच्या कालावधीनुसार कर्जाची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकतात.

Pan Card
PM Shram Yojana या सरकारी योजनेत 2 रुपये जमा करुन कसे मिळणार 36000 रुपये

कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही

ग्राहकाला पॅनच्या आधारे कर्ज घेण्यासाठी बँकेकडे कोणतेही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच बँका तुम्हाला काहीही तारण न ठेवता वैयक्तिक कर्ज देतात. मात्र पॅन कार्डवरील वैयक्तिक कर्ज देखील असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येते आणि यामुळेच बँका त्याद्वारे मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करत नाहीत.

ते खर्च करण्याचे बंधन नाही

गृहकर्ज किंवा वाहन कर्जाप्रमाणे वैयक्तिक कर्ज खर्च करण्याचे कोणतेही बंधन नाही. बँका तुम्हाला घर खरेदी किंवा दुरुस्तीसाठी गृहकर्ज देतात, तर कार खरेदीसाठी वाहन कर्जही उपलब्ध करून देते आहे. परंतु, तुम्ही कोणत्याही वैयक्तिक खर्चासाठी वैयक्तिक कर्ज वापरू शकता. उदाहरणार्थ, ही रक्कम उपचारासाठी किंवा प्रवासासाठी किंवा कोणत्याही कार्याचे आयोजन करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

Pan Card
PM Kisan Yojana: 'या' शेतकऱ्यांना पुढच्या हप्त्यात 2 हजारांऐवजी 4 हजार मिळणार? वाचा

ही अट पूर्ण करणे आवश्यक आहे

पॅन कार्डवर वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी, तुम्हाला काही सामान्य कागदपत्रे जोडावी लागतील, ज्यामध्ये तुमच्या कामाचा अनुभव देखील गरजेचा आहे. पॅनवर वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. अर्जदार एकतर पगारदार किंवा स्वयंरोजगार आहे का हे तपासले जाते. दोन्ही परिस्थितीत त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असायला हवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com