ओला, यामाहा, सुझुकी यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लवकरच भारतीय बाजारात

भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर बाजार तेजीत वाढत आहे. रिव्होल्टनंतर अ‍ॅथर एनर्जी, बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर्सच्या इतर कंपन्याही इलेक्ट्रिक स्कूटचा हब म्हणून भारताकडे पहात आहेत
Electric Bike
Electric Bikeदैनिक गोमन्तक
Published on
Updated on

देशात सध्या प्रत्येक क्षेत्रात महागाईचा भडका उडालेला पाहायला मिळत आहे. या महागाई सामान्य नागरिकांच्या खिशाला झाळ बसत आहे. यावर उपाय म्हणून देशात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक(Electric Bikes) वाहनांचा विचार होत आहे. परंतु भारतात सध्या इलेक्ट्रिक कारसंदर्भातील पर्याय फारच कमी आहेत. सध्या ज्या इलेक्ट्रिक कार(Electric Car) आहेत त्यांच्या किंमती देखील जास्त आहेत. अशा परिस्थितीत आपण इलेक्ट्रिक स्कूटरकडे जाऊ शकतो. पण त्यातही कोणती इलेक्ट्रिक स्कूटर सामन्यांना परवडू शकते? तसेच देशात आता कुठल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर येणार आहेत याबात सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

भारतातील इलेक्ट्रिक स्कुटरचा बाजार तेजीत वाढत आहे. रिव्होल्टनंतर अ‍ॅथर एनर्जी, बजाज (Bajaj)ऑटो आणि टीव्हीएस(TVS) मोटर्सच्या इतर कंपन्याही इलेक्ट्रिक स्कूटचा हब म्हणून भारताकडे पहात आहेत. सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणही खूप लवचिक बनविले आहे. उत्पादकांनाही अनुदानही दिले जात आहे. यामुळेच यामाहा सारख्या अनेक कंपन्या भारतात स्वतःचे इलेक्ट्रिक स्कूटरही आणणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Electric Bike
शांघाय संघटनेच्या बैठकीत अजित डोवाल यांचा महत्त्वाचा प्रस्ताव

यातच आता ओला इलेक्ट्रिक लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच करणार आहे. त्याची किंमतही जुलै महिन्यात कळू शकेल अशी माहिती मिळत आहे. ओलाने यापूर्वीच भारतीय शहरांमध्ये आपले 'हायपरचार्जर नेटवर्क' पसरवणे सुरू केले आहे. या नेटवर्कमध्ये भारतातील एकूण 400 शहरांमध्ये एक लाख चार्जिंग पॉईंटचा समावेश असेल. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला ५ मिनिटे चार्ज केल्यावर ही स्कूटर २४० किमी धावू शकेल.

याबरोबरच सुझुकी मोटरसायकल इंडिया लवकरच आपला इलेक्ट्रिक स्कूटर बर्गमन स्ट्रीट 125 लवकरच बाजारात आणणार आहे. कंपनी कित्येक महिन्यांपासून या इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी घेत आहे. परंतु ही स्कूटर कधी पर्यंत भारतात येईल याबद्दल अजूनतरी माहिती मिळू सकाळी नाही.

माध्यमांच्या एका रिपोर्टनुसार, यामाहा कंपनी देखील भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत आहेत. यमाचीही इलेक्ट्रिक स्कूटर पुढील एका वर्षात भारतात येऊ शकेल.

एकूणच काय तर भारतीयांसाठी लवकरच इलेक्ट्रिक स्कूटरचे अनेक स्वस्त पर्याय आपल्याला लवकरच उपलब्ध होऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com