Ola Zero Commission Plan: 10 लाख कॅब चालकांसाठी खूशखबर! कंपनीने केली झिरो कमिशनची घोषणा; आता संपूर्ण कमाई ठेवता येणार

Ola Zero Commission Policy: जर तुम्हीही ओला कॅब ड्रायव्हर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता ओला ड्रायव्हर्सकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण पैसे दिले जातील.
Ola Zero Commission Plan
Ola Zero Commission PlanDainik Gomantak
Published on
Updated on

जर तुम्हीही ओला कॅब ड्रायव्हर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता ओला ड्रायव्हर्सकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण पैसे दिले जातील. कंपनीच्या या निर्णयामुळे 10 लाखांहून अधिक ड्रायव्हर्स आता कोणत्याही राईडमधून मिळालेले संपूर्ण पैसे ठेवू शकतील. त्यामुळे आता त्यांच्या कमाईत प्रचंड वाढ होईल.

10 लाखांहून अधिक ओला ड्रायव्हर्स

ओला कंपनीच्या म्हणण्यानुसार, झिरो कमिशन मॉडेलचा फायदा 10 लाखांहून अधिक ड्रायव्हर्संना होईल. हा नियम ऑटो-रिक्षा, बाईक आणि कॅब सेवांना लागू होईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल असेही ओलाने म्हटले. आता ड्रायव्हर्स त्यांचे संपूर्ण उत्पन्न कोणत्याही निर्बंधाशिवाय ठेवू शकतात. ते त्यांच्या आवडीचा प्लॅन निवडू शकतात. हा एक मोठा बदल आहे, ज्यामुळे ड्रायव्हर्संना अधिक अधिकार मिळतील.

ओला ड्रायव्हर्सचे बल्ले-बल्ले

ओला कंझ्युमरच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण भारतात झिरो कमिशन मॉडेलची सुरुवात हा रायडर सेवा व्यवसायात एक मूलभूत बदल आहे. कमिशन काढून टाकल्याने शेअरिंग ड्रायव्हर्संना भरपूर मालकी आणि संधी मिळते. एकूणच, ओलाचा असा विश्वास आहे की, कमिशन काढून टाकल्याने ड्रायव्हर्संना अधिक संधी मिळतील.

Ola Zero Commission Plan
Ola Uber In Goa: CM सावंतांनी घोषणा केली, पण ओला- उबेरला रोखणे कितपत शक्य? काय म्हणते घटना?

'हा' नियम पहिल्यांदा कुठे लागू होणार!

ओला प्रक्तव्यानुसार, ड्रायव्हर्स हे वाहतूक व्यवस्थेचे कणा आहेत. त्यांना त्यांच्या कमाईवर पूर्ण नियंत्रण दिल्यास देशभरात अधिक लवचिक आणि शाश्वत रायडिंग व्यवसाय नेटवर्क तयार होण्यास मदत होईल. हा नवीन नियम हळूहळू लागू करण्यात येईल. पहिल्यांदा तो ओला ऑटोमध्ये लागू करण्यात येईल. त्यानंतर तो ओला बाइक आणि ओला कॅबमध्येही लागू करण्यात येईल.

Ola Zero Commission Plan
OLA Uber In Goa: गोव्यात ओला, उबेर सेवा येणार नाही; मुख्यमंत्री सावंत यांची टॅक्सी प्रश्नावर महत्वाची माहिती

सुरक्षिततेवर भर

दरम्यान, ओलाने प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दलही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, कॅब सेवेत ड्रायव्हर (Driver) जोडण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. यासोबतच, वाहनांची गुणवत्ताही पाहिली जाते. अ‍ॅपवर आपत्कालीन सुविधा देखील दिली जाते. एकूणच, ओलाच्या मते, सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com