Government Jobs: इंडियन आर्मी ते रेल्वे, सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या सविस्तर

government jobs
government jobs
Published on
Updated on

Government Job: तुम्हाला सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा आहे काय? वैज्ञानिक आणि बँकिंग कर्मचाऱ्यांपासून ते भारतीय लष्करापर्यंत अनेक सरकारी नोकरीचे अर्ज अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आपला शोध अधिक सरळ आणि सोपा करण्यासाठी आम्ही या आठवड्यात आपण अर्ज करु शकणार्‍या नवीन सरकारी पदभरतीविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे...

बीआयएस सायंटिस्ट बी भरती: (BIS Scientist B Recruitment 2021)

भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) अभियांत्रिकी पदवीधरांसाठी सायंटिस्ट-बी पदांसाठी अर्ज मागविले आहेत. एकूण 28 जागा उपलब्ध आहेत. अर्ज 25 जूनपर्यंत रपता येणार आहे. ज्यांना बीआयएस सायंटिस्ट-बी भरतीसाठी इच्छुक आहेत ते अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.

एचएसएससी पोलिस कॉन्स्टेबल भरती (HSSC Police Constables Recruitment 2021)

हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने (एचएसएससी) पोलीस विभागातील कमांडो विंग (ग्रुप सी) मधील पुरुष कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज मागविले आहेत. एकूण 520 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. हरियाणा पोलिसात रुजू होण्यास इच्छुक असणारा उमेदवार इयत्ता 12 वी  पास असणे गरजेचं आहे. उत्तीर्ण उमेदवार 14 जूनपासून अर्ज दाखल करू शकतात.

यूपीएससी एनडीए II (UPSC NDA II)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नौसेना अकॅडमी परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार अर्ज 29 जूनपर्यंत खुले राहणार आहे. ही परीक्षा 5 सप्टेंबरला होणार आहे.

आयबीपीएस आरआरबी पीओ, लिपिक भरती (IBPS RRB PO, Clerk Recruitment 2021)

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग चयन संस्थान (आयबीपीएस) ने स्केल 1, 2 आणि 3 क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये ऑफिस असिस्टंट (आरआरबी) या पदासाठी अर्ज मागविले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 8 जूनपासून सुरू झाली असून त्याची अंतीम मुदत 28 जून रोजी संपणार आहे. परीक्षापूर्व प्रशिक्षण चाचणी 19 ते 25 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे.

डीआरडीओ अप्रेंटिस भरती 2021(DRDO Apprentice Recruitment 2021)

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आपल्या जोधपूर कार्यालयात अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 47 जागा भरण्यात येणार आहेत. अधिकृत निवेदनानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जावून अर्ज भरावा लागेल.

बीसीईसीईबी भरती (BCECEB recruitment 2021)

बिहार संयुक्त प्रवेश प्रतिस्पर्धी परीक्षा मंडळाने (बीसीईसीईबी) राज्यभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात वरिष्ठ निवासी / शिक्षक पदासाठी अर्ज मागविले आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 1797 पदे भरली जातील. ऑनलाईन अर्ज 20 जूनपर्यंतच सादर करता येणार आहे, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

यूपीएसएसएससी पीईटी (UPSSSC PET 2021)

उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने (यूपीएसएसएससी)  'सी' गटाच्या पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी प्राथमिक पात्रता चाचणी (पीईटी) 2021 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यूपीएसएसएससीने आपल्या अधिकृत अधिसूचनेत सांगितले आहे की पात्र व इच्छुक उमेदवार 21 जूनपर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

भारतीय सेना एसएससी-टेक भरती (Indian Army SSC-Tech recruitment 2021)

भारतीय लष्कराने आपल्या लघु सेवा आयोगाच्या (एसएससी) अनुदानासाठी अविवाहित पुरुष आणि महिला अभियांत्रिकी पदवीधरांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. पात्र उमेदवार अधिकृत पोर्टलवर 23 जून रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. एकूणच पुरुष उमेदवारांसाठी 175 आणि महिला उमेदवारांसाठी 14 जागा रिक्त आहेत.

रेल्वे भरती 2021(Railway Recruitment 2021)

रेल्वे भर्ती सेल, पश्चिम रेल्वेने 3591 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांच्या अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 24 जूनपर्यंत रेल्वे भरती कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून अर्ज करु शकतात. या पदांसाठी थेट भरती होणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

यूपीआरव्हीएनएल जेई भरती (UPRVUNL JE recruitment 2021)
उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्थान निगम लिमिटेड (यूपीआरव्हीयूएनएल) यांनी कनिष्ठ अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदासाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 2 जुलै पर्यंत किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. एकूण 196 पदांसाठी भरती मोहीम राबविण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com