Krishi Ashirvaad Yojana: सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर, 6 हजार नाही तर आता खात्यात येणार एवढे रुपये, असा करा अर्ज

जर तुम्ही देखील सन्मान निधीचे लाभार्थी असाल आणि झारखंडमध्ये शेती करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
Krishi Ashirvaad Yojana
Krishi Ashirvaad YojanaDainik Gomantak
Published on
Updated on

Krishi Ashirvaad Yojana: भारत हा देश कृषीप्रधान देश म्हणुन ओळखला जातो. रात्रंदिवस कष्ट करून अन्न पिकवले जाते. एवढी मेहनत करूनही शेतकऱ्यांचा एक वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. 

अत्यंत कमी क्षेत्रावर शेती करून हे शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात. या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत आहेत. या योजनांमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा समावेश आहे.

ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक 6,000 रुपये अनुदान दिले जाते. चांगली गोष्ट अशी आहे की अनेक राज्य सरकारे पीएम किसानच्या (PM Kisan) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभ असलेल्या योजना चालवतात.

म्हणजेच पीएम किसानसह त्यांच्या राज्याच्या विशेष योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात. झारखंड सरकारनेही अशीच एक योजना चालवली आहे, ज्या अंतर्गत 5,000 रुपये अनुदान दिले जाते.

Krishi Ashirvaad Yojana
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, DA पुन्हा एकदा वाढणार!
  • कृषी आशीर्वाद योजना काय आहे?

झारखंडमध्ये 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या लागवडीपूर्वी 5,000 रुपये प्रति एकर दराने अनुदान दिले जाते. शेतकरी बांधवांना हवे असल्यास ते जास्तीत जास्त 5 एकर जमिनीसाठी 25,000 रुपयांपर्यंतचे अनुदान घेऊ शकतात.

राज्यातील पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे शेतकरी मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजनेचा लाभ घेऊ शकतात. अशा प्रकारे वर्षभरात एकूण 11,000 रुपये अनुदान उपलब्ध होणार आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही अटी लागु केल्या आहेत.

  • अर्जाची पात्रता

झारखंडमध्ये शेती करणाऱ्या 22 लाख 47 हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजनेचा लाभ मिळणार आहे.

१. झारखंडमधील केवळ अल्पभूधारक शेतकरीच कृषी आशीर्वाद योजनेचा लाभ घेऊ शकतात.

२. फक्त 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन घेणारे शेतकरीच पात्र असतील.

  • अर्ज कसा करायचा

एका वृत्तानुसार झारखंड सरकारने काही काळापूर्वी मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजनेसाठी अर्ज मागवले होते. तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असल्यास, तुम्ही  http://mmkay.jharkhand.gov.in/ येथे अर्जाची स्थिती तपासू शकता . या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजना अॅपही सुरू करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com