बिग बझार होणार 'गायब'; ब्रँड बदलतोय आपलं नाव

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या आठवड्यात बिग बाजारचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे.
Big Bazaar
Big BazaarDainik Gomantak
Published on
Updated on

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) गेल्या आठवड्यात बिग बाजारचा (Big Bazaar) ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. आता कंपनीने फ्युचर ग्रुपच्या या सर्वात मोठ्या ब्रँडचे नाव बदलण्याची सुरुवात केली आहे. (Now you will not see Big Bazaar Reliance going to have a new name)

Big Bazaar
भारतीय अर्थव्यवस्थेत 2030 पर्यंत होणार 800 अब्जांपर्यंत वाढ

बिग बझारचे नाव लवकरच बदलणार आहे.

रिलायन्स रिटेल आता त्या सर्व ठिकाणी नवीन रिटेल स्टोअर्स उघडणार आहे जिथे पूर्वी बिग बाजार असायचे. या नवीन स्टोअरचे नाव स्मार्ट बाजार असे असणार आहे. रिलायन्स रिटेल ही एक मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल क्षेत्रातील कंपनी आहे. हे आधीच रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स डिजिटल सारखी रिटेल स्टोअर्स चालवणारी कंपनी आहे.

स्मार्ट बाजार उघडण्यासाठी 950 ठिकाणी

रिलायन्स रिटेल 950 ठिकाणी स्वतःचे स्टोअर उघडण्याची योजना आखते आहे. ही सर्व ठिकाणे कंपनीने फ्युचर ग्रुपकडून आपल्या ताब्यात घेतली आहेत. कंपनी या महिन्यात सुमारे 100 ठिकाणी 'स्मार्ट बाजार' नावाने स्टोअर्स घडणार आहे. मात्र, या संदर्भात रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाहीये.

Big Bazaar
पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आता इंटरनेटची नाही गरज, कसं ते घ्या जाणून

अशाप्रकारे बिग बाजारचे अधिग्रहण केले,

फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यात 24,713 कोटी रुपयांची डील एका वर्षाहून अधिक काळ झाली आहे तर अ‍ॅमेझॉनच्या खटल्यांमुळे हा करार पूर्ण झालेला नाहीये. गेल्या आठवड्यापासून, रिलायन्सने आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे आणि फ्यूचर ग्रुपचे बिग बाजारचे स्टोअर ताब्यात घेतले आहेत. रिलायन्सने प्रथम बिग बाजार स्टोअर्स त्यांच्या नावावरती भाडेतत्त्वावर घेतले, परंतु फ्युचरला ऑपरेट करण्यास परवानगी दिली आहे. आता रिलायन्स स्टोअर्सचा ताबा घेत आहे, कारण फ्युचर त्यांचे भाडे देण्यास असमर्थ दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com