आता पोस्ट ऑफिसमध्ये काढा आरडी अकाऊंट

जर तुम्ही आगामी काळासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये करू शकता.
Post Office
Post OfficeDainik Gomantak
Published on
Updated on

जर तुम्ही आगामी काळासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये ते करू शकता. या योजनांमध्ये तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळतो. तसेच यामध्ये गुंतवलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. जर बँक डिफॉल्ट असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. पण पोस्ट ऑफिसमध्ये असे घटत नाही. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये अगदी कमी रकमेतून गुंतवणूक सुरू करता येते. पोस्ट ऑफिस (Post Office) रिकरिंग डिपॉझिट (RD) पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये देखील समाविष्ट आहेत.

Post Office
LIC IPO: एलआयसीने आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडे मागितली मंजूरी

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये (Scheme) सध्या 5.8 टक्के वार्षिक व्याजदर आहे. व्याज तिमाही आधारावर चक्रवाढ केले जाते, व्याज दर 1 एप्रिल 2020 पासून लागू असणार आहे. पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत, तुम्हाला एका महिन्यात किमान 100 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये 10 रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवली जाऊ शकते. या अल्पबचत योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाहीये.

या लहान बचत योजनेत, एक प्रौढ किंवा जास्तीत जास्त तीन एकत्र खाते उघडले जाऊ शकते. 10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्तीही पोस्ट ऑफिसमध्ये स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतो, या योजनेत कितीही खाती उघडता येतात.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये खाते उघडल्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी मॅच्युरिटी असते. संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करून खाते पुढील पाच वर्षांसाठी वाढवता येते. विस्तारित कालावधी दरम्यान लागू होणारा व्याजदर तोच असेल ज्यावर खाते उघडले होते. विस्तारित खाते विस्तारित कालावधी दरम्यान कधीही बंद केले जाऊ शकते. पूर्ण झालेल्या वर्षांसाठी, RD व्याज दर लागू होईल आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी, पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज दर लागू होईल. RD खाते मॅच्युरिटीच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी कोणत्याही ठेवीशिवाय ठेवता येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com