LIC IPO: एलआयसीने आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडे मागितली मंजूरी

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने रविवारी बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) लाँच करण्यासाठी कागदपत्रांचा मसुदा सादर केला.
LIC
LICDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने रविवारी बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) लाँच करण्यासाठी कागदपत्रांचा मसुदा सादर केला. सेबीच्या मंजुरीनंतर एलआयसी (LIC) मार्चमध्येच आपला आयपीओ बाजारात आणू शकते. (LIC Seeks SEBI Approval For IPO launch)

दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारने देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा IPO काढण्यासाठी 10 मर्चंट बँकर्सची नियुक्ती केली होती. यामध्ये गोल्डमन सॅक्स, सिटीग्रुप आणि नोमुरा यांचा समावेश होता. सिरिल अमरचंद मंगलदास यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने जुलै 2021 मध्ये एलआयसीच्या निर्गुंतवणुकीला मान्यता दिली होती. विशेष म्हणजे हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असल्याचे मानले जात आहे.

LIC
SBI ला 2022 मध्ये 'या' खात्यांमधून 8,000 कोटी मिळणे अपेक्षित

सामान्य व्यक्ती IPO मध्ये गुंतवणूक कशी करु शकेल?

एलआयसी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, प्रथम तुमच्याकडे पॅन आणि डीमॅट खाते तुमच्या एलआयसी पॉलिसी खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. म्हणजेच, तुम्हाला ही दोन्ही कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. LIC 65 वर्षांहून अधिक काळ भारतात जीवन विमा प्रदान करत आहे. विशेष म्हणजे भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ची निव्वळ संपत्ती SBI Life च्या 16.3 पट असून ही देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी विमा कंपनी आहे. या संदर्भात जारी केलेल्या अहवालानुसार, LIC 36.7 ट्रिलियन AUM सह भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक आहे. त्याची AUM एक स्वतंत्र आधारावर FY2011 साठी भारताच्या GDP च्या 18 टक्क्यांच्या समतुल्य होती.

LIC
Tata Steelची 2021-22 मध्ये देशात 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक

सरकारसाठी विन-विन डील असू शकते

चालू आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 78,000 कोटी रुपये करण्यात आले आहे. परंतु हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एलआयसीची सूचीही महत्त्वाची आहे. सरकारने आतापर्यंत एअर इंडियाचे खाजगीकरण आणि इतर PSUs मधील हिस्सेदारी विकून सुमारे 12,000 कोटी रुपये उभे केले आहेत.

जगातील शीर्ष 10 विमा कंपन्या

जगातील टॉप 10 विमा कंपन्यांमध्ये भारतीय कंपनी एलआयसीचा देखील समावेश आहे. या यादीतील पाच विमा कंपन्या चीनमधील असून पिंग हा जगातील सर्वात मौल्यवान विमा ब्रँड आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील दोन आणि फ्रान्स (France), जर्मनी (Germany) आणि भारतातील प्रत्येकी एका कंपनीचा समावेश आहे. LIC, भारतातील सर्वात मोठा शेअर विक्रेता, $8.656 अब्ज (Approximately Rs. 64,722 crore) मुल्यांकनासह देशातील सर्वात मजबूत आणि सर्वात मोठा ब्रँड आहे. यासोबतच हा जगातील तिसरा मजबूत विमा ब्रँड आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com