''देशात 2050 नंतर कुणीही उपाशी झोपणार नाही''

भारतात गरीबीचं प्रमाण जैसे थे
gautam adani
gautam adanidainik gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगभरात पुरेसे अन्न न मिळाल्याने उपाशी पोटी झोपावे लागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हेच प्रमाण भारतात ही अधिक आहे. तसेच नवीन अहवालाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार भारतातील गरिबी दर 12.3 टक्क्यांनी कमी झाला असला तरी ही भारतात गरिबीचे प्रमाण खुप आहे. देशातील गरिबी घटवण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना राबवत यावर उपाय शोधला असला तरी ही समस्या अद्याप ही समुळ नष्ट झालेली नाही. ["No one in the country will go to bed hungry after 2050"]

gautam adani
"मी स्वतःला सचिन तेंडुलकर अन् अमिताभ बच्चन समजतो ...:" पंतप्रधान बोरिस जॉन्सन

यामुळे देशात एकवेळचं पुरेशा अन्न मिळण्याची समस्या ज्वलंत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगपती गौतम अदानी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अंदाज व्यक्त केला आहे. देशानं 2050 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर्सचं लक्ष्य गाठलं तर या देशात कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही, असं उद्योगपती गौतम अदानी [gautam adani] यांनी सांगितलं आहे. अदानी हे इकोनॉमिक कॉन्क्लेव्ह दरम्यान बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, आपण 2050 पासून सुमारे 10 हजार दिवस दूर आहोत. या काळात आपण आपल्या अर्थव्यवस्थेत 25 ट्रिलियन डॉलर्सची भर घालेल असे मला वाटते.

gautam adani
पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांची दिल्लीत महत्वाच्या मुद्द्यांवर बैठक

या काळात आपण सर्व प्रकारची गरिबी दूर करू असे ही ते यावेळी म्हणाले. दुसरीकडे, 2011 ते 2019 दरम्यान भारतातील गरिबीच्या दरात मोठी घट झाल्याचे जागतिक बँकेने सांगितलं आहे.नवीन अहवालानुसार, या कालावधीत भारतातील गरिबी दर 12.3 टक्क्यांनी कमी झाला आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात गरिबी अधिक कमी झाली आहे. ग्रामीण गरिबीचा दर 2011 मध्ये 26.3 टक्के होता, जो 2019 मध्ये 11.6 टक्क्यांवर आला. शहरी गरिबी दर 14.2 टक्क्यांवरून 6.3 टक्क्यांवर आला आहे.

भारतात गरीबीचं प्रमाण जैसे थे

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अहवाल जारी करण्यात आला असून त्यामध्ये भारतातील गरीब 2019 मध्ये एक टक्क्यापेक्षा कमी होती. आता 2020 मध्ये कोरोनाच्या काळात देखील गरीबाचा दर स्थिर होता. त्यात कुठलीही वाढ झालेली नाही. सलग दोन वर्ष गरीबीची पातळी कमी आहे. त्यात महामारीच्या काळात देखील या पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे हे गरीबीचं उच्चाटन मानले जाऊ शकते, असं अहवालात म्हटल्याचं वृत्त आंतराराष्ट्रीय नाणे निधीने प्रसारमाध्यमाला दिल्याचं म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com