FASTag Policy: टेन्शन मिटलं! 3 हजार रुपयांच्या पासवर वर्षभर मोफत टोल; 'इतक्या' हजारांचा होणार फायदा

Nitin Gadkari New Fastag Scheme, FASTag Annual Pass: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (18 जून) वार्षिक फास्टॅगची घोषणा केली. याद्वारे खाजगी वाहन चालकांना वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्यापासून मुक्तता मिळेल.
Nitin Gadkari New Fastag Scheme, FASTag Annual Pass
Nitin Gadkari Dainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (18 जून) वार्षिक फास्टॅगची घोषणा केली. याद्वारे खाजगी वाहन चालकांना वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्यापासून मुक्तता मिळेल. ते ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय सहज प्रवास करु शकतील. 15 ऑगस्ट 2025 पासून 3,000 रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरु करण्यात येत आहे. खाजगी वाहन चालकांवरील टोलचा भार कमी करण्यासाठी सरकारने ही घोषणा केल्याचे सांगितले जात आहे.

फास्टॅग रिचार्जचा त्रास संपणार!

दरम्यान, या वार्षिक पासमुळे खाजगी वाहन चालकांना वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळेल आणि ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय सहज प्रवास करु शकतील.

Nitin Gadkari New Fastag Scheme, FASTag Annual Pass
Nitin Gadkari: 'विनंती', 'मागणी', 'अपेक्षा'! तीन शब्दांच्‍या शाली खांद्यावर घेऊन गडकरींनी गोवा सरकारला मारले जोडे

आता प्रवास सोपा होणार

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मते, हा पास विशेषतः केवळ गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन करण्यात आला असून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरुन सहज प्रवास करता येईल. वार्षिक पासचे नूतनीकरण करण्यासाठी लवकरच हायवे ट्रॅव्हल अॅप आणि एनएचएआय/एमओआरटीएच वेबसाइटवर एक वेगळी लिंक उपलब्ध करुन दिली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया सोपी होईल.

कोणत्याही निर्बंधाशिवाय इतका प्रवास करु शकणार

गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा 'पास' सुरु झाल्यापासून एक वर्ष किंवा 200 प्रवासांसाठी वैध असेल. हा पास विशेषतः कार, जीप आणि व्हॅन सारख्या गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी डिझाइन करण्यात आला आहे.

Nitin Gadkari New Fastag Scheme, FASTag Annual Pass
Nitin Gadkari: 'गडकरींनी गोव्याला काही कमी पडू दिले नाही'; मुख्यमंत्री सावंत, गुदिन्होंची स्तुतीसुमने, 4200 कोटींच्‍या प्रकल्‍पांचे भूमिपूजन

3000 रुपयांचा पास

सरकार खाजगी वाहनांसाठी 'फास्टॅग' आधारित वार्षिक 'पास' सुरु करणार आहे, ज्यासाठी तुम्हाला 3000 रुपये मोजावे लागतील. 15 ऑगस्टपासून ही सेवा लागू होईल, ज्यामुळे महामार्गांवर कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करणे शक्य होईल. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून 1 वर्षासाठी किंवा 200 ट्रिपपर्यंत, जे आधी पूर्ण होईल ते वैध असेल. जो केवळ वैयक्तिक वापरासाठी गैर-व्यावसायिक वाहनांसाठी वैध असेल.

Nitin Gadkari New Fastag Scheme, FASTag Annual Pass
Nitin Gadkari In Goa: 'गोव्याला प्रदूषण अन् अपघातमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्या'; गडकरींची मुख्यमंत्र्यांना सूचना!

तुमचे 7000 रुपये वाचणार

गडकरी यांनी पुढे सांगितले की, जर 3000 पासच्या 2000 फेऱ्यांचा टोल जोडला तर सुमारे 10 हजार रुपये खर्च येईल. म्हणजेच वार्षिक पास घेतल्यास त्यांना सुमारे 7 हजार रुपयांचा फायदा होईल.

वार्षिक पास कसा मिळवायचा?

राजमार्ग यात्रा अॅप, एनएचएआय आणि एमओआरटीएचच्या अधिकृत वेबसाइटवरुन पास सक्रिय आणि नूतनीकरण करता येतो. एकदा पैसे भरल्याने वर्षभर टोलचा ताण संपेल. पुन्हा पुन्हा टोल भरण्याची गरज भासणार नाही. 60 किमीच्या आत असलेल्या टोल प्लाझाची समस्या संपेल. लांब रांगांपासून आराम मिळेल, वेळ वाचेल आणि प्रवास (Travel) सोपा होईल. हा पास केवळ कार, जीप आणि व्हॅनसाठी असेल. ही योजना व्यावसायिक वाहनांवर लागू होणार नाही. हा पास एक वर्षासाठी वैध असेल किंवा 200 पर्यंतच्या फेऱ्यांसाठी वापरता येईल. यापैकी जो पास आधी पूर्ण होईल तोच वैध असेल. गेल्या महिन्यात सरकार नवीन टोल धोरणावर काम करत असल्याची चर्चा होती, ज्यामुळे महामार्गावरील प्रवास प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि किफायतशीर होऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com