PM Kisan Yojana 24th Installment Released: 9.34 कोटी शेतकऱ्यांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! पीएम किसानचा 24वा हप्ता जारी; स्टेटस तपासा

PM Kisan Yojana 24th Installment Released: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा 24वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (डीबीटी) करण्यात आला.
PM Kisan Yojana 24th Installment Released
PM Kisan Yojana 24th Installment ReleasedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PM Kisan Yojana 24th Installment Released: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा 24वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (डीबीटी) करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आणि अर्जात कोणत्याही त्रुटी नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळाला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (30 ऑक्टोबर 2026) सकाळी 10:30 वाजता गुजरातच्या बनासकांठा येथील 'एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान' प्रयोगशाळा आणि 'भारत बोव्हाइन ब्रीडिंग अँड रिसर्च सेंटर'ला भेट दिली. यानंतर सकाळी 11:30 वाजता बनासकांठा येथे 14000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्राला समर्पण केले. याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पीएम-किसान योजनेअंतर्गत 19000 कोटी रुपयांचा 24वा हप्ता अधिकृतरित्या जारी केला.

PM Kisan Yojana 24th Installment Released
PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! 30 ऑक्टोबरला जमा होणार पीएम किसानचा 24वा हप्ता, पण 'या' 5 चुकांमुळे अडकू शकतात तुमचे 2,000 रुपये

या 24व्या हप्त्याद्वारे देशभरातील 9.34 कोटींपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या (Farmer) बँक खात्यांमध्ये 18,690 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट जमा करण्यात आली. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. डिजिटल इंडिया आणि डीबीटी प्रणालीच्या प्रभावी वापरामुळे मध्यस्थांशिवाय थेट शेतकऱ्यांपर्यंत हे पैसे पोहोचले. या आर्थिक मदतीमुळे ऐन सण-उत्सवाच्या काळात आणि आगामी शेती कामांसाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.