FM Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली खूशखबर, उत्पन्न दुप्पट करण्याचा सांगितला प्लॅन!

Nirmala Sitharaman For Farmers: कृषी-वित्त संस्थेला ग्रामीण उत्पन्न सुधारणेला सर्वोच्च प्राधान्य देऊन तळागाळात कार्यक्षमता आणि परिणाम सुनिश्चित करण्यासाठी काम करण्याचा सल्ला दिला.
FM Nirmala Sitharaman
FM Nirmala SitharamanDainik Gomantak
Published on
Updated on

FM Nirmala Sitharaman: शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार वेळोवेळी योजना आणत असते. यातच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी नाबार्डला शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर तसेच पाणी-केंद्रित पिके, विशेषत: भरड तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया यांच्याकडे वळण्यास प्रोत्साहित करण्यास सांगितले.

नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) च्या आढावा बैठकीत, सीतारामन यांनी कृषी-वित्त संस्थेला ग्रामीण उत्पन्न सुधारणेला प्राधान्य देऊन तळागाळात कार्यक्षमता आणि परिणाम सुनिश्चित करण्यासाठी काम करण्याचा सल्ला दिला.

अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिली

सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष 2023 मध्ये 'श्री अन्न' चे उत्पादन आणि विपणन हे राष्ट्रीय प्राधान्य आहे. अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांनी नाबार्डला बाजरीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmer) प्रोत्साहित करावे आणि जे शेतकरी आधीच बाजरी पिकवत आहेत त्यांच्या फायद्यांचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले.

FM Nirmala Sitharaman
FM Nirmala Sitharaman: करदात्यांवर अर्थमंत्री 'मेहरबान', आली नवी व्यवस्था; करचुकवेगिरी केल्यास...

कमी पाणी वापरणाऱ्या पिकांकडे लक्ष द्या

अर्थमंत्रालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर परंतु कमी पाणी-केंद्रित पिके, विशेषत: बाजरी, कडधान्ये आणि तेलबिया या पिकांकडे वळवण्यासाठी संवेदनशील करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांवर भर दिला आहे."

ईशान्येकडील राज्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल

ग्रामीण पत वाढीसाठी पावले उचलण्याबरोबरच पूर्वोत्तर राज्यांवर लक्ष केंद्रित करुन शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) द्वारे सेंद्रिय उत्पादकांचे एकत्रिकरण सुलभ करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी नाबार्डला दिले.

FM Nirmala Sitharaman
FM Nirmala Sitharaman: पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

अर्थ मंत्रालयाने सांगितले

दुसर्‍या ट्विटमध्ये, अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) आणि प्रमुख योजनांमधून निधी प्राप्त झालेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी 17 जून रोजी 'चिंतन शिविर' आयोजित करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com