Toll Tax: हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने टोल टॅक्स केला कमी!

Nitin Gadkari on Toll Tax: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी टोल टॅक्स भरणाऱ्यांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या आहेत.
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Toll Tax New Rules: तुम्हीही हायवेवरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. होय... तुम्हाला यातून दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी टोल टॅक्स भरणाऱ्यांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या आहेत.

आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल टॅक्सच्या दरात कपात केली आहे, याचा अर्थ तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी टोल टॅक्स भरावा लागेल. आता नवीन दर काय आहेत ते पाहूया.

Nitin Gadkari
Toll Tax Rules: नितीन गडकरींची मोठी घोषणा, टोल टॅक्सच्या नियमात बदल होणार; FASTag मधून...

NHAI ने माहिती दिली

NHAI ने टोल टॅक्स कमी केल्याने दिल्ली (Delhi), हरियाणा आणि पंजाबमधील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीने पानिपत-रोहतक राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी टॅक्स कमी केला आहे.

एनएचएआयकडून सांगण्यात आले की, डहर गावात असलेल्या प्लाझावरील टोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कमी केलेले दर 26 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

डहर टोल प्लाझाचे व्यवस्थापक अभिषेक यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल टॅक्स कमी केला आहे. नवीन दर 26 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. गेल्या वर्षी 1 एप्रिल 2022 रोजी टोल प्लाझाचे दर वाढवण्यात आले होते, जे आता कमी करण्यात आले आहेत.

Nitin Gadkari
Toll Tax Rules: नितीन गडकरींची घोषणा, टोल टॅक्सच्या नियमात मोठा बदल!

आता त्यासाठी फक्त रु.

नवीन दरांनुसार, आतापासून पानिपत-रोहतक राष्ट्रीय महामार्गावर कार, जीप आणि व्हॅनसारख्या वाहनांना एकेरी मार्गासाठी 60 रुपये आणि दोन्ही बाजूंसाठी 90 रुपये मोजावे लागतील. तर, यापूर्वी, तुम्हाला यासाठी 100 आणि 155 रुपये खर्च करावे लागत होते.

कोणत्या वाहनावर किती कर आकारला जाईल?

NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरुन जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी या मार्गावरुन धावणाऱ्या व्यावसायिक वाहनांना आणि मिनीबसेसना एका बाजूसाठी 160 रुपये आणि दोन्ही बाजूंसाठी 235 रुपये मोजावे लागत होते.

त्याचबरोबर हा दर आता 100 रुपयांवर आणला असून, दोन्ही बाजूचे दर 150 रुपयांवर आले आहेत.

Nitin Gadkari
Income Tax Calculator: मोदी सरकारने लढवली शक्कल, टॅक्स कॅल्क्युलेटर...

नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत

याशिवाय, जर बस (Bus) आणि ट्रक चालकांबद्दल बोलायचे झाल्यास, या लोकांना पूर्वी एका बाजूसाठी 320 रुपये आणि दोन्ही बाजूंसाठी 480 रुपये मोजावे लागत होते, तर आता ते 205 आणि 310 रुपये करण्यात आले आहे.

तीन एक्सल असलेल्या व्यावसायिक वाहनांना एका बाजूला 225 रुपये आणि दोन्ही बाजूला 340 रुपये खर्च करावे लागतील. यासोबतच, इतर वाहनांसाठीही टोलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.