मारुती सुझुकी देशातली सर्वात मोठी व आघाडीची वाहन निर्माता कंपनी आहे. मारुती सुझुकीने बनवलेल्या ४५ टक्के वाहने सध्या देशात वापरली जात आहेत. मारुती उद्योग लिमिटेड ह्या नावाने १९८१ साली ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. मारुती सुझुकीने अल्टो 800 वर्ष 2000 मध्ये पहिल्यांदा लॉन्च केली होती. देशातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या मॉडेलपैकी एक ही कार आहे. प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांची पहिली पसंती बर्याच काळापासून या कारला आहे.
मारुती सुझुकीने अल्टो 800 (Alto800) कारचे न्यू जनरेशन मॉडेल नव्या दमात लॉन्च केलं आहे. त्याची किंमत, फिचर्स आणि लुक बघता भारतातील अन्य कंपन्यांच्या वाहनांना Alto 800चे नवीन वेरिअंट तगडी टक्कर देईल. गेल्या काही वर्षांत अल्टोच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे कंपनी लवकरच देशात न्यू जनरेशन मॉडेल मारुति ऑल्टो 2022 लॉन्च करेल. ऑल्टोचे नवीन मॉडेल सेलेरियो हॅचबॅकमधील स्टाइलिंग घटक सामायिक करतात. या कारमध्ये 800cc, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे.
नवीन मारुती अल्टो 2022 पूर्णपणे नवीन एक्सटीरियर सोबत येते. यात मोठे स्वीप्टबॅक हेडलॅम्प, नवीन बंपर आणि टेललाइट्स मिळतील. समोरच्या बाजूस नवीन Celerio प्रमाणे डिझाइनसह एक नवीन आणि मोठी ग्रिल मिळेल. हॅचबॅक पूर्वीपेक्षा लांब आहे आणि बॉक्सियर साइड प्रोफाइल आहे. नवीन मॉडेलला फ्लॅट रूफलाइन आणि आकर्षक फेंडर्स मिळतात.
नवीन मारुती अल्टोचा आकार पूर्वीपेक्षा मोठा आहे, त्यामुळे केबिनमध्ये जागा अधिक उपलब्ध होईल. नवीन अल्टोच्या केबिनमध्येही एक्सटीरियरप्रमाणेच मोठे बदल होणार आहेत. कारमध्ये पूर्णपणे नवीन डॅशबोर्ड आणि सेंट्रल कन्सोल डिझाइन मिळेल. हॅचबॅकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, कीलेस एंट्री, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि इतर वैशिष्ट्यांसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची शक्यता आहे.
800cc, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन अल्टो 800 कारच्या न्यू जनरेशन मॉडेलमध्ये मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सीएनजीवर चालणारे मॉडेलही उपलब्ध असेल. नवीन मॉडेलची किंमत ही जुन्या मॉडेलच्या तुलनेत जास्त असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.