Online Payment: नोटबंदीनंतर ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. नोटबंदीआधी 80 टक्के काम नोटाद्वारे व्हायचे. आता हे प्रमाण ऑनलाईनच्या बाबतीत दिसून येते. ज्यामध्ये युपीआय, पेमेंट वॉलेट आणि कॅशलेस पर्याय उपलब्ध आहेत. याद्वारे लाखो करोडोचे व्यवहार रोज पार पडत असतात.
ऑनलाईन व्यवहारामुळे मोठ्या प्रमाणात मदत होत असते पण त्याचबरोबर सायबर गुन्ह्यामध्ये वाढदेखील होत आहे. आपल्या लहान चुकांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशा घटना आपण अनेकदा आजुबाजूला पाहिल्या असतील. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही सोपे उपाय आपण करु शकतो .
1.ऑनलाईन पेमेंट करताना आपला युपीय आयडी वेगवेगळ्या उपकरणांवर अथवा वेगवेगळ्या ठिकाणी टाकून ठेऊ नये.
2. अनेकजण एकच यूपीआई आईडी आणि पासवर्ड ठेवतात, परंतु हे धोकादायक बनू शकते.वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पासवर्ड ठेवणे आवश्यक आहे.
3. कोणताही विचार न करता कोणत्याही वेबसाईटसवर आपले कार्ड डिटेल्स टाकणे , सायबर गुन्ह्यांना आमंत्रण दिल्यासारखे आहे.
4. टेम्परेरी क्रेडिट कार्ड्सचा वापर करावा.
5.पब्लिक वाय-फायचा वापर करणे टाळावे. पब्लिक वाय-फायचा वापर करुन पेमेंट करणे हॅकर्सना आमंत्रण देण्यासारखे आहे.
6.तुमचा सीसीव्ही कोणासोबत शेअर करु नका.
योग्य काळजी घेत ऑनलाईन पेमेंट ( Online Payment ) केले तर ते सुरक्षित आहे. फक्त अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.