Ration Card Latest News: तुम्हीही मोफत राशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये सुरु केलेली पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) 31 डिसेंबर 2022 रोजी संपेल. 28 सप्टेंबर रोजी मोदी मंत्रिमंडळाने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांना प्रति व्यक्ती 5 किलो दराने मोफत अन्नधान्य दिले जाते. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मोफत राशनची सुविधा बंद केली जाईल.
धान्य खुल्या बाजारात विकावे
केंद्र सरकार (Central Government) ही योजना पुढे नेण्याची आशा फार कमी आहे. कारण NITI आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) बंद करण्याबद्दल बोलले होते. सरकारने मोफत राशन योजनेसाठी दिलेले धान्य खुल्या बाजारात विकावे, असे ते म्हणाले होते. आर्थिक घडामोडी सामान्य असताना PMGKAY सारखी योजना सुरु ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही, असेही त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले होते.
देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किमतीत वाढ
ते पुढे म्हणाले होते की, 'या योजनेसाठी मासिक आधारावर वाटप करण्यात येणारा 4 दशलक्ष टन तांदूळ-गहू महागाई (Inflation) कमी करण्यासाठी आणि आरबीआयवरील दबाव कमी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.' ऑक्टोबरमध्ये अन्नधान्याची महागाई दर 12.08% होता, जो नोव्हेंबरमध्ये 11.55% वर आला होता. दुसरीकडे, देशांतर्गत बाजारात गव्हाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. नवीन पीक येईपर्यंत दरात वाढ होत राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
साठा 19 दशलक्ष टनांवर आला
मागणी वाढल्याने आणि गव्हाचा साठा कमी झाल्याने गव्हाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशांतर्गत बाजारातच एप्रिल-मेनंतर गव्हाच्या किमतीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गोदामांमधील गव्हाचा साठा 19 दशलक्ष टनांवर आला आहे. अशा स्थितीत आगामी काळातही भाव वाढण्याची शक्यता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.